जीवनावश्यक वस्‍तूंचे कारखाने, उद्योग सुरू ठेवा ः जिल्हाधिकारी इटनकर

नांदेडः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा व उत्‍पादन सुरळीत राहणे आवश्‍यक असल्याने या वस्‍तूंचा पुरवठा करणारे कारखाने, उद्योग कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना विविध निर्देश दिले आहेत.
Essential Factories, Industries start Continue: Collector Itankar
Essential Factories, Industries start Continue: Collector Itankar

नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा व उत्‍पादन सुरळीत राहणे आवश्‍यक असल्याने या वस्‍तूंचा पुरवठा करणारे कारखाने, उद्योग कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना विविध निर्देश दिले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आंतरराज्‍य, आंतर जिल्‍हा, आंतर तालुका वाहतूक नियंत्रण व त्‍या संबंधाने येणाऱ्या तक्रारी सोडविण्‍याची जबाबदारी देण्‍यात आली आहे. लॉकडाऊनच्‍या कालावधीत जीवनावश्‍यक वस्तूंचे वाहतुकी संबंधाने आवश्‍यक ती कामे पार पाडावी. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत मोबाईल ९८२२२४६०२३ या कार्या‍न्‍वयीन यंत्रणेशी संपर्क साधावा.

औद्योगिक विकास महामंडळाने लॉकडाऊनच्‍या कालावधीत जीवनावश्‍यक वस्‍तूंचे सतत उत्‍पादन, प्रक्रिया करणारे विविध कारखाने, उद्योग तसेच या वस्‍तूंचा पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांची आस्‍थापना या कालावधीत चालू राहतील याची दक्षता घ्‍यावी. त्यानुसार विविध उपाययोजना कराव्यात. विविध कारखाने, उद्योग, जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांना आवश्‍यक असणारा कामगार वर्ग उपलब्‍ध न झाल्‍यास सहायक कामगार आयुक्‍त यांच्याशी समन्‍वय साधून आवश्‍यक कार्यवाही करावी.

त्या अनुषंगाने कामे पार पाडतांना ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासंबंधी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेले शासन निर्णय, विविध परिपत्रके, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेशातील नमूद अटी व शर्तीच्‍या अधिन राहून आवश्‍यक ती कार्यवाही करावी. या कामात कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून कुचराई, दिरंगाई केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com