‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल डिस्टन्सिंग’, स्वच्छता पाळा’

नाशिक : रेशन दुकानांवर धान्य वितरण करताना, तसेच शिवभोजन केंद्रांवर ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि स्वच्छता पाळा, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.३) दिल्या.
In the essentials store 'Social Distance', follow cleanliness : Bhujbal
In the essentials store 'Social Distance', follow cleanliness : Bhujbal

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे रेशनद्वारे अन्न-धान्य देण्यात येत आहे. तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. दरम्यान, रेशन दुकानांवर धान्य वितरण करताना, तसेच शिवभोजन केंद्रांवर ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि स्वच्छता पाळा, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.३) दिल्या. 

भुजबळ यांनी नाशिक शहरातील रेशन दुकान व शिवभोजन केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यातील गरजू नागरिक उपाशी राहू नये, यासाठी शासनाने रेशनद्वारे अन्न-धान्य व शिवभोजन केंद्रांद्वारे केवळ पाच रुपयांत जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत पाच रुपये दराने १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. यावेळी शासनाच्या सूचनांचे पालन करावे.’’ 

बाहेरून आलेल्या मजुरांसाठी शासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात २३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्रे व अन्नछत्राची सुविधा केंद्रे सुरु केली आहेत. त्यात एकूण ५७९ लोक आश्रय घेत आहेत. भुजबळ यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा क्र.१ म्हसरूळ येथील केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com