agriculture news in Marathi establish board for wine Maharashtra | Agrowon

फळांपासून वाइननिर्मितीसाठी महाराष्ट्र बोर्ड स्थापन करा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

फळांपासून वाइन तयार करण्याच्या अनुषंगाने संशोधन, विकास, उत्पादन, विपणन, कृषी पर्यटन, वाइन कला व संस्कृती आशा बाबींचा समावेश महत्त्वाचा आहे.

नाशिक : द्राक्षाबरोबर डाळिंब, जांभूळ, करवंदांपासून वाइनचे उत्पादन केले जात आहे. फळांपासून वाइन तयार करण्याच्या अनुषंगाने संशोधन, विकास, उत्पादन, विपणन, कृषी पर्यटन, वाइन कला व संस्कृती आशा बाबींचा समावेश महत्त्वाचा आहे. यासाठी रोजगाराच्या संधी व वाइन उद्योगाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र वाइन बोर्ड स्थापन करा, अशी मागणी उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

वाइन उद्योगाबाबत आढावा घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप, सहआयुक्त यतीन सावंत, अंमलबजावणी संचालक उषा वर्मा, उपायुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या उपस्थितीत वाइन उत्पादकांची बैठक नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी येथे झाली. संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर, सचिव संजीव पैठणकर यांच्यासह इतरांनी चर्चेत सहभाग नोंदवला.

राज्य फलोत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे प्रक्रिया म्हणून वाइन उद्योगाची राज्याला संधी आहे. त्या माध्यमातून नवीन संधी, भौगोलिक मानांकन, वाइन उत्पादनाचे प्रमाणीकरण करण्यासाठी बोर्डाची आवश्यकता आहे. यासाठी बोर्ड उपयुक्त ठरेल, असा दावा वाइन उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला. ‘फ्रूट टू ग्लास’ अशा पद्धतीने वाइन उद्योगाची वाढ होण्यासाठी संघटित साखळी उभी करण्याची आवश्यकता आहे, असा सूर निघाला. 

वाइनला प्रोत्साहन देण्यासाठी २००१ मध्ये धोरण स्वीकारले होते. या वाइन धोरणाला २०११ नंतर दहा वर्षांची मुदत मिळाली होती. ही मुदत पुढील वर्षी २०२१ मध्ये संपुष्टात येत असल्याने फक्त द्राक्ष वाइन प्रक्रिया न करता, फळांपासून वाइन उत्पादन हे एकच धोरण असावे. जेणेकरून इतर राज्यांना धोरण बनविण्याच्या अनुषंगाने आकर्षित करण्यात येईल, असे अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सुचविले.

आगामी धोरणात वाइन उद्योग वाढीच्या दृष्टीने काय निर्णय घ्यायला हवेत, या अनुषंगाने वाइन उत्पादकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. गुणवत्तेच्या अनुषंगाने कडक नियमावली मान्य आहे, मात्र इतर अकारण असलेले नियम काढून टाका, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने द्राक्ष वाइन बागा, वाइन उत्पादन युनिटला भेटी दिल्या.

बैठकीत करण्यात आलेल्या मागण्या
प्रत्येक राज्यातील वाइन विक्रीवर करप्रणाली व धोरण एकसारखे हवे. यासाठी सर्वसहमती तयार करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्याने पुढाकार घ्यावा. युरोपियन देशांप्रमाणे वाइनला अन्नाचा दर्जा द्या मद्य व वाइन संकल्पना वेगळी करून विक्री व्यवस्थेत सुलभता आणावी
 


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...