`शेतकऱ्यांची बांबू उत्पादक कंपनी स्थापन करा`

`शेतकऱ्यांची बांबू उत्पादक कंपनी स्थापन करा`
`शेतकऱ्यांची बांबू उत्पादक कंपनी स्थापन करा`

जालना : ‘‘अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी. तसेच बांबू पिकाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी,’’ असे मत महाराष्ट्र बांबू बोर्डाचे मराठवाडा समन्वयक पी. बी. भालेकर यांनी व्यक्‍त केले. 

खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात मासिक चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले. भारतीय एकात्मिक औषध संस्था, जम्मू येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. आर मीना, डॉ. सुमीत गांधी, डॉ राजेंद्र भंवारिया, औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र कुलकर्णी, मराठवाडा शेतीसाह्य मंडळाचे विश्‍वस्त विजयअण्णा बोराडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते. 

भालेकर म्हणाले, ‘‘बांबू लागवडीच्या अनुषंगाने अटल बांबू योजना राबविली जात आहे. बांबूचे दर्जेदार उत्पादन घेतल्यास अधिकाधिक नफा मिळू शकतो. बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, प्लाय, टेबल खुर्ची अशा अनेक वस्तू तयार करता येतात.’’ 

डॉ. मोटे म्हणाले, ‘‘उन्हाळ्यामध्ये चारा उपलब्ध करण्यासाठी मुरघासद्वारे हिरव्या चाऱ्याचे संवर्धन करता येऊ शकते. मका, बाजरी, ज्वारी यापासून मुरघास शक्‍य आहे. मुरघास तयार करण्यासाठी विविध बिझनेसचे मॉडेल तयार झाले आहे. दुष्काळी स्थितीत याद्वारे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. सी.आर.ए. तंत्रज्ञान हवामान अनुकूल शेती पद्धतीमुळे झाडांच्या मुळाच्या परिघात सिंचन देण्याचे तंत्र विकसित झाले आहे. कमी पाण्यावर वृक्षवाढ शक्‍य आहे. उन्हाळ्यात बागा वाचनविण्याचे तंत्रज्ञान असून, त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा.’’  

डॉ. मीना म्हणाले, ‘‘सुगंधी गवत लागवडीसाठी जिल्ह्यातील जमीन योग्य आहे. कमी पाण्यावर येणारे वाण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सुगंधी गवताची लागवड करून तेल निर्मितीच्या व्यवसायाकडे वळावे. हिमरोझा सीके-१० या सुधारित वाणापासून प्रतिएकरी चार कापण्यांपासून ७० ते ८० किलो तेल मिळू शकते. त्यापासून एक ते सव्वा लाखाचा फायदा होतो.’’ 

बोराडे म्हणाले, ‘‘पारंपरिक शेती ही मजूर आणि पाण्यामुळे अडचणीत सापडली आहे. सुगंधी गवत व बांबु लागवड हे अडचणीत सापडलेल्या शेतीला पर्याय आहेत.’’ कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com