Agriculture news in marathi Establish Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Agricultural University: Kisan Army | Agrowon

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठ स्थापन करा : किसान आर्मी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या चार जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी केली आहे.

सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या चार जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कृती समिती स्थापन केली असून, पश्चिम महाराष्ट्रासोबतच उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांचाही जाहीर पाठिंबा या कृषी विद्यापीठासाठी घेणार असल्याचे कदम यांनी सांगितले. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो.

यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एकूण जमिनीपैकी तब्बल ३७.५ टक्के क्षेत्राचा म्हणजे ११६.१२ लाख हेक्टर एवढ्या प्रचंड मोठ्या जमिनीचा समावेश होतो. 
महाराष्ट्रातील एकूण नऊ कृषी हवामान विभागापैकी चार कृषी हवामान विभागात विद्यापीठाचे क्षेत्र व्यापले आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले विद्यापीठ प्रचंड विस्तार आणि भौगोलिक सलगते अभावी आपल्या

अधिपत्याखालील क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही, यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांनाही याचा थेट फायदा होणार आहे. कारण उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ असावे, ही त्यांची अनेक वर्षाची मागणी आहे. 

राज्यात आदिवासीचे सर्वाधिक वास्तव्य असणाऱ्या या जिल्ह्यात मानवी विकास निर्देशांक खाली आहे. त्याचबरोबर या भागात परंपरागत शेती करणारा समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मोठ्या समुहाला नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून आधुनिक शेतीच्या प्रवाहात वेगाने आणता येईल, असेही कदम यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

पंढरपूर, सांगोला ठिकाण योग्य
सोलापूरला होत असणारे नवीन विमानतळ, प्रयोगशील शेतकरी या बाबींचा विचार करता सांगोला किंवा पंढरपूर (जि. सोलापूर) ही मध्यवर्ती तालुके सोयीचे व पूरक आहेत. त्याचबरोबर माळशिरस (जि. सोलापूर), फलटण (जि. सातारा) या तालुक्यांत शेती महामंडळाच्या हजारो एकर जमिनी आहेत, याचाही उपयोग कृषी विद्यापीठासाठी करता येईल, असेही कदम यांनी सूचवले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...