सोलापुरात साखर कारखान्याच्या काटा तपासणीसाठी संयुक्त पथक

सोलापुरात साखर कारखान्याच्या काटा तपासणीसाठी संयुक्त पथक
सोलापुरात साखर कारखान्याच्या काटा तपासणीसाठी संयुक्त पथक

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या वजन काटे तपासणीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी    राजेंद्र भोसले यांनी यासंबंधीचे आदेश दिले. या  पथकामध्ये वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलिस, प्रादेशिक सहसंचालक(साखर) आणि साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधीचा समावेश आहे.

भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार असून सदस्य म्हणून वैधमापन शास्त्र विभागाचे वजनमापे निरीक्षक एस. के. बागल, कारखान्याच्या हद्दीतील पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यासाठी लेखापरीक्षक पी. आर. शिंदे, बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ या तालुक्यांसाठी लेखा परीक्षक एन. डी. माढे आणि उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यांसाठी लेखा परीक्षक के. आर. धायफुले यांचा समावेश आहे. या पथकामध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून संबंधित तालुक्याचे तहसीलदार एका प्रतिनिधीची नियुक्ती करणार आहेत.

भरारी पथकांनी कारखान्यात अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी. जेणेकरून वजनमापासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर आळा बसेल. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्यप्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करावी. एखाद्या साखर कारखान्यावर वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या ठिकाणी वजनकाट्याची तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या पथकाने कार्यवाहीचा अहवाल दर पधंवाड्यास जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करायचा आहे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com