नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष स्थापन  

नांदेड ःअत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वाहतूक प्रमाणपत्र देण्यासाठी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवारी (ता. २८) कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यान्वित राहील. या कक्षाचा ई-मेल आयडी collectoroffice०९@gmail.com आहे. जिल्ह्यातील वाहनधारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ईमेलवर अर्ज करता येतील. सोबत वाहनाचे आरसीबुक, फिटनेस प्रमाणपत्र, करपावती, वाहनांचा विमा, परमिट आदी वैध कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर यांनी केले आहे.
Establishment of Traffic Certificate Room at Nanded
Establishment of Traffic Certificate Room at Nanded

नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वाहतूक प्रमाणपत्र देण्यासाठी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवारी (ता. २८) कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यान्वित राहील. या कक्षाचा ई-मेल आयडी collectoroffice०९@gmail.com आहे. जिल्ह्यातील वाहनधारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ईमेलवर अर्ज करता येतील. सोबत वाहनाचे आरसीबुक, फिटनेस प्रमाणपत्र, करपावती, वाहनांचा विमा, परमिट आदी वैध कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक ८४२१८०००९९ हा आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, सीमा तपासणी नाके देगलूर, बिलोली आणि सीमा तपासणी केंद्र भोकर यांच्याकडून वाहतूक प्रमाणपत्र दिले जात आहे. कार्यालयाच्या mh२६@mahatranscom.in या ई-मेलवर वाहन क्रमांक नमूद करुन अर्ज केल्यास ई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल.

नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयात सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. दूरध्वनी क्रमांक ०२४६२- २३४७२० व हेल्पलाइन क्रमांक १०९१ आणि १०० क्रमांकाच्या पाच लाईन सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलातर्फे व्हॉट्सअप मॅसेज सेवा सरू करण्यात आली आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असते त्याचा क्रमांक ८८८८८८९२५५ हा आहे. त्यावर देखील नागरिकांना माहिती द्यावी, असे आवाहन पलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com