खानदेशात कापूस लागवड वाढण्याचा अंदाज

मागील हंगामात कापसाखाली जेवढे क्षेत्र होते, त्यात वाढ होईल, हे गृहीत धरूनच आम्ही कापूस बियाण्यांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करू. सुमारे २३ ते २४ लाख पाकिटांची आवश्‍यकता आगामी हंगामातही राहील. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
कापूस लागवड वाढण्याचा अंदाज
कापूस लागवड वाढण्याचा अंदाज

जळगाव : खानदेशात आगामी खरिपात कापूस लागवड किंचित वाढण्याच शक्यता आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्र व बियाण्याची गरज लक्षात घेऊन बीटी आणि अन्य प्रकारातील सुमारे ३५ लाख पाकिटांची गरज असणार आहे. पाऊस कसा असेल, यावरच लागवड अवलंबून असल्याचेही सूत्रांनी सांगितले.  

कापूस हे खानदेशचे प्रमुख पीक आहे. जळगाव जिल्ह्यात खरिपाखाली एकूण ७ लाख ५० हजार ७७५ हेक्‍टर क्षेत्र असू शकते. कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ५६ हजार ५९३ आहे. आगामी हंगामात कापसाखाली क्षेत्र खानदेशात ३० ते ३५ हजार हेक्‍टरने वाढू शकते.

जळगाव जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र ४ लाख ८७ हजार ३१० हेक्‍टर क्षेत्र राहण्याच अंदाज आहे. धुळ्यात सुमारे दोन लाख आणि नंदुरबारातही ८० ते ९० हजार हेक्‍टरवर लागवड होऊ शकते. 

कापूस बियाण्यासंबंधीचे अंदाज कृषी विभाग बांधत आहे. यानुसार बीटी कापूस बियाण्याची अधिक मागणी करण्याची भूमिका पुढील हंगामातही कृषी विभाग ठेवणार आहे. परंतु देशी कापूस बियाणे अधिक उपलब्ध करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण जळगाव, शिरपूर, शहादा, रावेर, यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, तळोदा भागात अनेक शेतकरी पूर्वहंगामी लागवडीसाठीदेखील देशी कापूस वाणांना पसंती देतात. एकट्या जळगाव जिल्ह्यात आगामी हंगामातही २३ ते २४ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्‍यकता असणार आहे. धुळ्यात सुमारे आठ लाख व नंदुरबारात चार ते पाच लाख पाकिटांची गरज असेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com