agriculture news in marathi, Estimated increase in rabi cultivation in Yavatmal district | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात रब्बी लागवड वाढण्याचा प्रशासनाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

यवतमाळ : जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात समाधानकारक झालेला पाऊस, प्रकल्पात बऱ्यापैकी असलेला पाणीसाठा, विहिरीची वाढलेली पाणीपातळी, यामुळे रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती विरोधाभासी असल्याचे चित्र आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात समाधानकारक झालेला पाऊस, प्रकल्पात बऱ्यापैकी असलेला पाणीसाठा, विहिरीची वाढलेली पाणीपातळी, यामुळे रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती विरोधाभासी असल्याचे चित्र आहे.

खरिप हंगामात पावसाने दिलेला खंड, त्यानंतर परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची भिस्त असताना त्यानेही दिलेला फटका, यामुळे रब्बी पिके घेण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल नाही. याच कारणामुळे जिल्ह्यातील ९ तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र रब्बी पेरणी वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यानुसार नियोजनदेखील करण्यात आले आहे.
यंदा कृषी विभागाने १ लाख ९८ हजार ४०४ हेक्‍टरवर रब्बी पीक लागवडीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख ५४ हजार २३४ हेक्‍टरवर हरभरा, ३८ हजार ६६६ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय दोन हजार हेक्‍टरवर ज्वारी, ४३७ हेक्‍टरवर मका, तीन हजार हेक्‍टरवर इतर पिकांचा समावेश आहे. जलयुक्‍त शिवार तसेच शेततळ्याची या वर्षी चांगली कामे झाल्याने त्याचा फायदा पिकांना होण्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. परंतु जिल्ह्याच्या ९ तालुक्‍यांतील दुष्काळी स्थितीचे चित्र वेगळेच आहे.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...