नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १७ लाख १४ हजार २४२ हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला. या तीन जिल्ह्यात विविध पिकांच्या ३ लाख ७ हजार ३५८ क्विंटल बियाणे आणि बीटी कपाशी बियाण्यांच्या २४ लाख ५० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली.
Estimated sowing on 17 lakh 14 thousand hectares in Nanded, Parbhani, Hingoli district
Estimated sowing on 17 lakh 14 thousand hectares in Nanded, Parbhani, Hingoli district

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १७ लाख १४ हजार २४२ हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला. या तीन जिल्ह्यात विविध पिकांच्या ३ लाख ७ हजार ३५८ क्विंटल बियाणे आणि बीटी कपाशी बियाण्यांच्या २४ लाख ५० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. विविध ग्रेडचा ३ लाख ८४ हजार ३८० टन खतसाठा मंजूर झाला आहे. 

जिल्ह्यात यंदा ७ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडदाच्या क्षेत्रात वाढ, तर कापूस, तुरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ७ लाख ७० हजार ३२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा विविध पिकांच्या १ लाख ६५ हजार ४०४ क्विंटल बियाणे, कपाशी बियाण्यांच्या ९ लाख ६५ हजार बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली. विविध ग्रेडच्या २ लाख २७ हजार ९८० टन खतसाठा मंजूर झाला आहे. 

परभणी जिल्ह्यात ५ लाख ३८ हजार ७०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यंदा कपाशी, तूर, मूग, उडीद या पिकांच्या क्षेत्रात वाढ, तर सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ५ लाख ३५ हजार हेक्टवर पेरणी झाली होती. यंदा पेरणीसाठी विविध पिकांच्या ८७ हजार १७१ क्विंटल बियाण्यांची आणि कपाशीच्या १२ लाख ६० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. विविध ग्रेडच्या ९१ हजार १७० टन खतसाठा मंजूर झाला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा ३ लाख ७८ हजार ९४२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात २ हजार हेक्टरने घट, तर सोयाबीनच्या क्षेत्रात ५ हजार ९३ हेक्टरने, तुरीच्या क्षेत्रात २ हजार हेक्टरने, मूग, उडदाच्या क्षेत्रात प्रत्येकी अडीच हजार हेक्टरने वाढ गृहित धरण्यात आली. गतवर्षी ३ लाख ६७ हजार ८७० हेक्टरवर पेरणी झाली. यंदा ५४ हजार ७८३ क्विंटल बियाण्यांची आणि कपाशी बियाण्यांच्या २ लाख २५ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. विविध ग्रेडचा ६५ हजार २३० टन खतसाठा मंजूर झाला आहे.  जिल्हानिहाय खरीप पिकांचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) 

पिके नांदेड परभणी हिंगोली एकूण
सोयाबीन ३९५००० २२५००० २५५४०० ८७५४००
कापूस २०३००० २२३००० ४५००० ४७१००० 
तूर ६९८०० ५१००० ५२५०० १७३३०० 
मूग ३२००० २५००० ९७६० ६६७६०
उडिद ३७००० ८००० ८००३ ५३००३ 
ज्वारी ५५५०० ४५०० ६३३९ ६६३३९ 
बाजरी १२० ५०० ४५ ६६५ 
भात ९८० ००० ००० ९८०
इतरपिके ४३०० ३०० २५५ ४८५५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com