नगरमधील पीक नुकसानीचा प्रशासनाला लागेना अंदाज

अतिपावसाने झालेल्या खरिपातील पिकांचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, अजूनही पंचनामे सुरू नसल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक अंदाजही व्यक्त केला नसल्याने नेमके नुकसानीचा अंदाज प्रशासनाकडेही नाही.
Estimates of crop damage in the city are not available to the administration
Estimates of crop damage in the city are not available to the administration

नगर ः अतिपावसाने झालेल्या खरिपातील पिकांचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, अजूनही पंचनामे सुरू नसल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक अंदाजही व्यक्त केला नसल्याने नेमके नुकसानीचा अंदाज प्रशासनाकडेही नाही. पंचनामे करण्याचे आदेशच जिल्हाधिकारी कार्यालयातून उशिराने निघाल्याने पंचनामे व्हायला उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे.

नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस आणि बाजरीचे पूर्णतः नुकसान केले होते. तीच अवस्था यंदाही झाली आहे. आता सहा-सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी त्याआधी तब्बल महिनाभर सतत जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमूग, कांदा पिकांत पाणी साठवून राहिले. जमिनी चिबडल्या, पिकांचे जागेवर नुकसान झाले. साधारण पन्नास टक्क्‍यापेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान झाल्याने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले होते.

मात्र, पंचनामे करण्याचे प्रत्यक्ष आदेश नसल्याने पंचनामे केलेच जात नसल्याची बाब उघड झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ३० सप्टेंबरला पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश निघाले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर लेखी पत्र देऊन तातडीने तीन दिवसांत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे सांगितले.

बांधावर अधिकारी गेलेच नाहीत यंदा जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पाणी उपलब्धता मुबलक झाली असली तरी सतत महिनाभर पाऊस सुरू राहिल्याने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यानंतर प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाणी करत शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असते. नगर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. ना अधिकारी बांधावर गेले ना लोकप्रतिनिधी. केवळ पंचनामे सुरू आहेत एवढेच सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com