agriculture news in marathi, Ethanol policy discussion meet tommorow in pune | Page 2 ||| Agrowon

पुण्यात उद्या ठरणार ‘इथेनॉल’चे धोरण
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

पुणे : पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण दहावरून वीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावे, यासह एकूणच देशभरातील इथेनॉलचे नव्याने धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘इथेनॉल हे वाहतुकीचे इंधन’ या विषयावर पुण्यात उद्या (शुक्रवारी, ता. २४) परिषद होणार आहे. याचे उद्‌घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल.

पुणे : पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण दहावरून वीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावे, यासह एकूणच देशभरातील इथेनॉलचे नव्याने धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘इथेनॉल हे वाहतुकीचे इंधन’ या विषयावर पुण्यात उद्या (शुक्रवारी, ता. २४) परिषद होणार आहे. याचे उद्‌घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) वतीने आयोजित या परिषदेस पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एएनईआरचे केंद्रीय सचिव आनंद कुमार उपस्थित राहतील, अशी माहिती सीआयआरटीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

पाटील म्हणाले, ‘‘देशात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने 
इंधन साठ्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ८२ टक्के इंधन आयात करावे लागत आहे. सध्या देशात केवळ १८ टक्के इंधन साठा शिल्लक असून, पंधरा वर्षांनंतर देशाला पेट्रोल, डिझेलसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दहा टक्केच इथेनॉलचे मिश्रण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये वीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करणे गरजेचे आहे. तसे केल्यास पैशाचीही बचत होईल.’’

महाराष्ट्रातील ९५ टक्के साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती करण्याची क्षमता आहे. पूर्ण क्षमतेने त्याचा वापर केल्यास वर्षाला ६५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. सध्या केवळ ३० ते ३५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होत असून केंद्र सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. 
- राजेंद्र पाटील, संचालक, सीआयआरटी

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...