इथेनॉल दरवाढीचा साखर कारखान्यांना लाभ : आयसीआरए

इथेनॉल दरवाढीचा साखर कारखान्यांना लाभ : आयसीआरए
इथेनॉल दरवाढीचा साखर कारखान्यांना लाभ : आयसीआरए

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या इथेनॉल खरेदीदर वाढविण्याच्या निर्णयाचा साखर कारखान्यांच्या लाभात वाढ होण्यास मदत होईल, असे क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया (आयसीआरए) या मानांकन संस्थेने म्हटले आहे.  कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सभ्यसाची मजुमदार म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांच्या एकूण उलाढालीत १० ते १५ टक्के वाटा हा इथेनॉलचा आहे. इथेनॉलच्या वाजवी दरात वाढीच्या निर्णयामुळे साखर कारखाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी पुरवठा वाढवतील. या निर्णयाचा फायदा साखर कारखान्यांना महसूल, नफ्यासह ऊस उत्पादकांची देणी देण्याच्या क्षमतेत वाढीसाठी होईल.’’ केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ३) साखर वर्षा (डिसेंबर २०१९-नोव्हेंबर २०२०) साठी उसापासून १०० टक्के निर्मिती होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केली. यात ‘बी-हेव्ही मोलॅसिस’ (जड मळी) करिता गेल्या (२०१८-१९) वर्षीच्या ५२.४३ रुपये प्रतिलिटरवरून यंदाच्या (२०१९-२०) करिता ५४.२७ रुपये प्रतिलिटरपर्यंत दरवाढ करण्यात आली. तसेच सी-हेव्ही मोलॅसिसकरिता अनुक्रमे २९ पैसे वाढवून ५९.४८ रुपये प्रतिलिटर आणि ४३.७५ रुपये लिटर दरवाढ करण्यात आली. या निर्णयाने जैवइंधन उत्पादनात आणि केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात देशातील साखर कारखान्यांच्या सहभागात वाढ होईल. परिणामी, भारताच्या कच्च्या तेल आयातीत घट होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, साखर आणि साखर सिरप (रसा)पासून इथेनॉल निर्माण करणाऱ्या साखर कारखान्यांकडून खरेदीची परवानी तेल कंपन्यांना केंद्र सरकारने दिली आहे.  मिश्रणाची टक्केवारी वाढणार : तेल कंपन्यांनी २०१८-१९ (डिसेंबर-नोव्हेंबर) या वर्षात २६ लाख लिटर इथेनॉल साखर कारखान्यांकडून खरेदीचे करार केले होते. तर, २०१९-२० या वर्षात केंद्र सरकारच्या जैवइंथन धोरणानुसार पेट्रोलमध्ये ७ टक्के इथेनॉल मिश्रणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच २६ लाख टनचे लक्ष ठेवण्यात आले आहे. २०२०-२२ मध्ये इथेनॉल मिश्रणाची टक्केवारी ७ वरून १० टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com