agriculture news in Marathi ethanol production target on 108 crore liter Maharashtra | Agrowon

राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

साखर कारखान्यांनी नवे इथेनॉल प्रकल्प उभारणी तसेच इथेनॉल निर्मिती ८३ टक्क्यांनी वाढवून १०८ कोटी लिटरवर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थात, यंदा नवे केवळ दोन प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे आहेत.

पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता असल्यामुळे धास्तावलेल्या साखर कारखान्यांनी नवे इथेनॉल प्रकल्प उभारणी तसेच इथेनॉल निर्मिती ८३ टक्क्यांनी वाढवून १०८ कोटी लिटरवर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थात, यंदा नवे केवळ दोन प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

नव्या इथेनॉल प्रकल्पांमध्ये स्वराज शुगर (फलटण) व जयवंत शुगर (कराड) यांचा समावेश आहे. यातून तीन कोटी लिटर उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

गेल्या हंगामात राज्यात ऊस कमी होता. त्यामुळे कारखान्यांचे लक्ष साखर निर्मितीवर होते. तेल विपणन कंपन्या इथेनॉल विकत घेतात. त्यांच्याकडून मिळणारा दर अपेक्षित नव्हता. त्यामुळे कारखान्यांना इथेनॉलमध्ये स्वारस्य नसल्याने निर्मितीत केवळ १८ कोटी लिटर झाली होती. चालू हंगामात चित्र उलटे झाले असून साखर निर्मिती घटविण्याचे उद्दिष्ट प्रथमच कारखान्यांनी ठेवले आहे. 

‘‘ऊस गाळप तयार करण्यासाठी यंदा १९९ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, इथेनॉल निर्मितीची क्षमता केवळ ७२ कारखान्यांकडे आहे. ही क्षमता १४७ कोटी लिटर्स इतकी असली तरी विविध कारणांमुळे गेल्या हंगामातील इथेनॉल निर्मिती नगण्य होती. यंदा मात्र उत्पादन १०८ कोटी लिटर्सपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे,’’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यात साखर कारखान्यांची संख्या २०० पेक्षा जास्त असली तरी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणी अथवा विस्तारीकरणात काही कारखान्यांना अडचणी आहेत. केंद्र सरकारच्या व्याज अनुदान योजनेत १३३ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच सर्व ठिकाणी इथेनॉल निर्मिती शक्य नसल्याचे दिसते आहे. नव्या प्रकल्पांची उभारणी देखील किचकट व वेळखाऊ असते. यात एक-दोन वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे नवे किंवा विस्तारित प्रकल्प लगेचच उत्पादनात भर घालतील, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, असे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

बॉयलरमुळे २५ कोटीचा भुर्दंड 
इथेनॉलचा नवा प्रकल्प उभारण्यासाठी साखर कारखान्यांना किमान ६० कोटी रुपये गुंतवावे लागतात. त्यात पुन्हा शासनाने या प्रकल्पात भस्मीकरण व बाष्पक प्रक्रियेसाठी स्वतंत्र ‘इन्सिनिरेशन बॉयलर’ उभारणे सक्तीचे करण्यात आले आहे. परिणामी वाढीव २५ कोटींपेक्षा जास्त खर्च कारखान्यांना करावा लागत आहे. 

प्रतिक्रिया
साखर संघाने इथेनॉल प्रचारार्थ यंदा राज्यभर पाच मेळावे घेतले. चालू हंगामात भरपूर ऊस आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचे संकट टाळण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्थितीत साखर उत्पादन घटवायचे आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील साखर कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. 
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ 

बी-हेव्ही मोलॅसिसपासून तसेच शुगर सिरप (शर्करा पाक) माध्यमातून राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा जास्तीत जास्त इथेनॉल उत्पादन वाढवावे. या प्रक्रियेमध्ये साखर उत्पादन आठ टक्के कमी होते. इथेनॉल उत्पादन वाढून त्या विक्रीपोटी यंदा साखर कारखान्यांच्या हाती दर १५ दिवसाला पैसा येईल. त्यामुळे एफआरपीचे वाटप करण्यासाठी कारखान्यांना हातभार लागणार आहे. 
- संजयकुमार भोसले, साखर सहसंचालक (उपपदार्थ विभाग), साखर आयुक्तालय 
 


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...