महापुराच्या नुकसानीनंतरही पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त

या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर झाली आहे. ही सुधारित पैसेवारी आहे. मात्र अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. परंतु पैसेवारी अशीच राहिल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Even after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paise
Even after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paise

सांगली ः या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर झाली आहे. ही सुधारित पैसेवारी आहे. मात्र अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. परंतु पैसेवारी अशीच राहिल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याची सुधारित पैसेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाहीत. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. कृष्णा आणि वारणेला महापूर आला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्यांत महापुराने पिकांचे अतोनात नुकसान झाले. तरीही या तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षांपेक्षा जास्त निश्‍चित झाली आहे. कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, मिरज तालुक्यांच्या पूर्व भाग आणि कडेगाव तालुक्यात महापुराचे पाणी सोडले होते. त्यामुळे तेथील विहिरी, तलाव, ओढे-नाले वाहते राहिले. त्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.  दरम्यान, २०१९ मध्ये देखील अतिवृष्टी आणि महापूर आला होता. तेव्हा पलूस, वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले होते. या वेळी या तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. त्यामुळे या तालुक्यांना शासकीय सवलती मिळाल्या होत्या. सध्या ही पैसेवारी सुधारित असली तरी, अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. मात्र या अंतिम पैसेवारीत फारसे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना महापुराच्या मदतीवरच अवलंबून राहवे लागण्याची शक्यता आहे.  मात्र या वर्षी या तालुक्यात महापुराने पिकांचे नुकसान झाले. असले तरी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आल्याने शासकीय सवलती मिळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com