Agriculture news in marathi Even sending messages to buy corn Farmers do not come to the shopping center | Agrowon

मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी केंद्रात शेतकरी येईना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी खरेदी केंद्रांवर दहा दिवसांत १,०३२ मका उत्पादकांनी नोंदणी केली. त्यापैकी एका केंद्रावरील ३० शेतकऱ्यांना खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. परंतु, कुणी मका घेऊन न आल्याने खरेदीस अजून प्रारंभच झाला नसल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी खरेदी केंद्रांवर दहा दिवसांत १,०३२ मका उत्पादकांनी नोंदणी केली. त्यापैकी एका केंद्रावरील ३० शेतकऱ्यांना खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. परंतु, कुणी मका घेऊन न आल्याने खरेदीस अजून प्रारंभच झाला नसल्याची स्थिती आहे. 

रब्बीत सर्वाधिक मका उत्पादक जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. हमी दरापेक्षा कमी दराने मक्याची खरेदी होत असल्याचे पाहून खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात करमाड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री व सिल्लोड या ठिकाणी राज्य शासनाने केंद्रे सुरू केली. ही सर्व केंद्रे १८ मे रोजी कार्यान्वित झाली.

या केंद्रांवरून गत दहा दिवसांत १०३२ शेतकऱ्यांनी मक्याची खरेदी व्हावी म्हणून नोंदणी केली. त्यामध्ये करमाड केंद्रावरील ५०, कन्नड २१३, वैजापूर १८४, गंगापूर २००, खुलताबाद २१० सोयगाव १, फुलंब्री १७४ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी कन्नड केंद्रावरील ३० शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. मात्र, अजून एकाही केंद्रावर मक्याची खरेदी झाली नाही. 

५ हजार क्विंटलवर तूरीची खरेदी 

जिल्ह्यात सहा ठिकाणच्या खरेदी केंद्रावरून ९२० शेतकऱ्यांकडील ५ हजार ९२ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली. ही सर्व तूर गोडाउनमध्ये साठविण्यात आली. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १३७९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये सर्वाधिक गंगापूर केंद्रावरील १००९ शेतकऱ्यांचा समावेश होता. 

९५४ हरभरा उत्पादकांची नोंदणी 

हरभऱ्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील सहा केंद्रांवरून ९५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ८७४ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यांपैकी चार केंद्रांवरील ५२९ शेतकऱ्यांकडून ५६६९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यांपैकी ४ हजार २१ क्विंटल हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला. तर, १६४८ क्विंटल हरभरा साठविणे बाकी आहे. 
 


इतर बाजारभाव बातम्या
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...