ऐन उन्हाळ्यातही लिंबूला मागणी नाही; उत्पादक हैराण 

अमरावती ः मागणीच नसल्याने तोडणीसाठी आलेल्या फळांचे करावे तरी काय ? असा प्रश्‍न लिंबू उत्पादकांना पडला आहे. सुमारे १३० हेक्‍टरवरील लिंबू उत्पादकांसमोर ही समस्या निर्माण झाली आहे.
Even in summer, lemon is not in demand; Producer shocked
Even in summer, lemon is not in demand; Producer shocked

अमरावती ः मागणीच नसल्याने तोडणीसाठी आलेल्या फळांचे करावे तरी काय ? असा प्रश्‍न लिंबू उत्पादकांना पडला आहे. सुमारे १३० हेक्‍टरवरील लिंबू उत्पादकांसमोर ही समस्या निर्माण झाली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुका लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्‍यातील माहूली चोर, मंगरुळ चव्हाळा, पिंपरी, धानोरा गुरव, पहूर, पापळ, जामगाव, नांदसावंगी, शेलुगुंड, येणस, कणी मिर्झापूरसह इतर काही गावांमध्ये शेतकरी लिंबाचे उत्पादन घेतात. शासकीय नोंदीनुसार सुमारे १३० हेक्‍टरवर या भागात लिंबू लागवड आहे. 

लिंबूच्या अर्थकारणातून या भागातील अनेक गावांमध्ये समृद्धी आली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात लिंबाला ५० ते ६० रुपये किलोचा दर मिळतो. आता मात्र, ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपायांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल बंद तर घरगुती ग्राहकांच्या फिरविण्यावर निर्बंध यामुळे लिंबाची मागणी घटून दर १५ ते २० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. 

एप्रिलचे काही दिवस आणि मे महिना माल विक्रीसाठी शिल्लक आहे. परंतु लॉकडाऊन ३ मे पर्यंत असल्याने यातून फारसा दिलासा मिळण्याची शक्‍यता नसल्याचे लिंबू उत्पादक सांगत आहेत. 

बागेतील लिंबूचा माल तयार आहे. पण संचारबंदीमुळे यावेळी विकण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लिंबाला ग्राहकांची मागणी नसल्याची स्थिती यावर्षी पहिल्यांदाच अनुभव आहे. नाही तर उन्हाळ्यात लिंबू हातोहात विकल्या जातो.  अंकुश झंझाट, शेतकरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com