वर्ष संपायला आले तरी पीकविम्याचा लाभ मिळेना

अतिवृष्टी, संततधार पावसाने यंदाच्या हंगामातील मूग, उडदाचे पीक १०० टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. या शेतकऱ्यांना डिसेंबर महिना संपायला आला तरी अद्याप पीकविम्याचा एक छदामही मिळालेला नसल्याचे समोर आले आहे.
Even though the year came to an end, I did not get the benefit of crop insurance
Even though the year came to an end, I did not get the benefit of crop insurance

अकोला ः अतिवृष्टी, संततधार पावसाने यंदाच्या हंगामातील मूग, उडदाचे पीक १०० टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. या शेतकऱ्यांना डिसेंबर महिना संपायला आला तरी अद्याप पीकविम्याचा एक छदामही मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. ही नुकसानभरपाई कधी मिळेल? अशी विचारणा शेतकरी यंत्रणांकडे करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी मूग आणि उडदाचे पीक पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. जिल्ह्यात सुमारे ३३ हजार हेक्टर मूग आणि १८ हजार हेक्टरवर उडिदाची लागवड झाली होती. यापैकी बहुतांश क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांना पीकविमा १०० टक्के मिळणे अपेक्षित आहे.  आजवर मात्र काहीही हातात आलेले नाही. मध्यंतरी पीक नुकसानीची २५ टक्के भरपाई म्हणून ६८ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम १ लाख सात हजार शेतकऱ्यांना वितरीत केल्या गेली. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात पहिल्यांदा अकोला जिल्ह्याने अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर ही रक्कम मिळाली होती. यामध्ये मूग, उडीद उत्पादकांचा समावेश नव्हता. मूग उडदाच्या सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला संपूर्ण नुकसान भरपाईमुळे मदतीची शेतकरी अपेक्षा बाळगून आहेत. ही मदत कधी मिळेल याचे उत्तर कुठलाही अधिकारी मात्र, द्यायला तयार नाही.

या हंगामात लागवड केलेल्या उडीद पिकाचे १०० टक्के नुकसान झाल्याने एकही रुपयाचा खर्च निघाला नव्हता. याबाबत कृषी विभाग, विमा कंपनीकडे कळवलेले आहे. अद्याप मदत आलेली नाही. आम्ही चौकशी करून थकलो.- सारंगधर मोतीराम बोदडे, तळेगाव बाजार, तेल्हारा  जि. अकोला

मी १० एकरांचा मूग, उडदासाठी पीकविमा काढला होता. पावसामुळे पीक हातातून गेले. पुराच्या पाण्यातही पीक खरडले होते. यंदा मूग, उडदाचे काहीही उत्पादन आलेले नाही. त्यामुळे मदतीची अपेक्षा बाळगून आहोत. - ज्ञानेश्‍वर वाघोडे, सांगवी हिवरे, ता. तेल्हारा, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com