नागपुरात पावणेदोन वर्षातही  कर्जमाफीची प्रक्रिया अपूर्णच 

शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सरकारने कर्जमाफीची योजना आणली. परंतु पावणेदोन वर्षात संपूर्ण लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही.
 नागपुरात पावणेदोन वर्षातही  कर्जमाफीची प्रक्रिया अपूर्णच  Even in two and a half years in Nagpur The debt forgiveness process is incomplete
नागपुरात पावणेदोन वर्षातही  कर्जमाफीची प्रक्रिया अपूर्णच  Even in two and a half years in Nagpur The debt forgiveness process is incomplete

नागपूर : शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सरकारने कर्जमाफीची योजना आणली. परंतु पावणेदोन वर्षात संपूर्ण लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात शेकडो शेतकरी आजही माफीच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.  सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शासनाकडून कर्जमाफीची देण्यात आली. फडणवीस सरकारच्या काळात दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. परंतु त्यांच्याकडून टाकण्यात अटी जाचक असल्याची टीका झाली. शेतकऱ्यांना माफीच्या लाभासाठी रांगेत उभे राहावे लागले. तीन वर्षांतही योजना पूर्ण झाली नाही. नंतर सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारनेही महात्मा जोतीराव शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांचा लाभ देण्यात आला. २०१५ नंतरच्या कर्जदार शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला. ही कर्जमाफी डिसेंबर २०१९ला जाहीर करण्यात आली. पावणेदोन वर्ष होत असताना अद्याप संपूर्ण शेतकऱ्यांना याच लाभ मिळाला नाही. त्यामुळे कित्येक शेतकरी आजही लाभाच्या प्रतीक्षेत आहे. 

प्रतिक्रिया सरकारने जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी प्रशासनाने लवकर करायला हवी. दोन- दोन वर्षे माफीच्या योजनेच्या लाभ मिळत नसेल तर फायदा काय?  वंदना बालपांडे, जिल्हा परिषद सदस्य 

प्रतिक्रिया अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातात पैसा राहिला नाही. माफीचा लाभ मिळण्यासाठी काही ज्या त्रुटी असतील, त्या प्रशासनाने पूर्ण करून शेतकऱ्यांना लाभ द्यायला हवा. प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाची प्रतिमाही डागाळत आहे.  मिलिंद सुटे, सदस्य, जिल्हा परिषद 

कर्जमाफी योजनेवर दृष्टिक्षेप  आतापर्यंत अपलोड झालेली खाती - ५०६१५  आधार प्रामाणीकरण झालेली खाती - ४५३६२  आधार प्रामाणीकरण न झालेली खाती - ७७६  लाभ मिळालेली खाती - ४४३३५  कर्जमाफी झालेली रक्कम - ३७८.८४ कोटी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com