Agriculture News in Marathi Even in two and a half years in Nagpur The debt forgiveness process is incomplete | Page 2 ||| Agrowon

नागपुरात पावणेदोन वर्षातही  कर्जमाफीची प्रक्रिया अपूर्णच 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सरकारने कर्जमाफीची योजना आणली. परंतु पावणेदोन वर्षात संपूर्ण लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. 

नागपूर : शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सरकारने कर्जमाफीची योजना आणली. परंतु पावणेदोन वर्षात संपूर्ण लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात शेकडो शेतकरी आजही माफीच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. 

सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शासनाकडून कर्जमाफीची देण्यात आली. फडणवीस सरकारच्या काळात दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. परंतु त्यांच्याकडून टाकण्यात अटी जाचक असल्याची टीका झाली. शेतकऱ्यांना माफीच्या लाभासाठी रांगेत उभे राहावे लागले. तीन वर्षांतही योजना पूर्ण झाली नाही. नंतर सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारनेही महात्मा जोतीराव शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली.

दोन लाख रुपयांपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांचा लाभ देण्यात आला. २०१५ नंतरच्या कर्जदार शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला. ही कर्जमाफी डिसेंबर २०१९ला जाहीर करण्यात आली. पावणेदोन वर्ष होत असताना अद्याप संपूर्ण शेतकऱ्यांना याच लाभ मिळाला नाही. त्यामुळे कित्येक शेतकरी आजही लाभाच्या प्रतीक्षेत आहे. 

प्रतिक्रिया
सरकारने जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी प्रशासनाने लवकर करायला हवी. दोन- दोन वर्षे माफीच्या योजनेच्या लाभ मिळत नसेल तर फायदा काय? 
वंदना बालपांडे, जिल्हा परिषद सदस्य 

प्रतिक्रिया
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातात पैसा राहिला नाही. माफीचा लाभ मिळण्यासाठी काही ज्या त्रुटी असतील, त्या प्रशासनाने पूर्ण करून शेतकऱ्यांना लाभ द्यायला हवा. प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाची प्रतिमाही डागाळत आहे. 
मिलिंद सुटे, सदस्य, जिल्हा परिषद 

कर्जमाफी योजनेवर दृष्टिक्षेप 
आतापर्यंत अपलोड झालेली खाती - ५०६१५ 
आधार प्रामाणीकरण झालेली खाती - ४५३६२ 
आधार प्रामाणीकरण न झालेली खाती - ७७६ 
लाभ मिळालेली खाती - ४४३३५ 
कर्जमाफी झालेली रक्कम - ३७८.८४ कोटी  

 
 


इतर बातम्या
सोलापूर : ऊसबिलासाठी महिन्यापासून सुरू...सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर...
गटशेतीद्वारे उत्पादनात वाढ होईल ः डॉ....रत्नागिरी ः ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार...
जळगाव : करपात्र १५,१३३ लाभार्थी शेतकरी...जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
जळगाव जिल्ह्यात मतदारयाद्यांवर १५ हजार...जळगाव ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार...
विसापुरात ७४ वीजजोड तोडले; शेतकरी...विसापूर, जि. सांगली :  येथील ७४ शेतकऱ्यांचे...
कोदामेंढीत विषाणूजन्य रोगामुळे मिरची...कोदामेंढी, नागपूर  : वातावरणातील बदलामुळे...
बीडमध्ये किसान सभेने जाणल्या...बीडमध्ये : किसान सभेच्या ‘शेतकऱ्यांची दिवाळी...
वऱ्हाडात हरभऱ्याच्या लागवडीला आला वेगअकोला ः रब्बी हंगामासाठी पोषक परिस्‍थिती आहे....
शिरूर तालुक्यात वीजजोड तोडल्याने पिके...पुणे : महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजजोड...
परभणी विभागात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे...परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी...
रत्नागिरीत अवकाळी पावसाने मोडले कंबरडेसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर...
परभणी जिल्ह्यात शेतीमाल तारणावर १ कोटी...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत...