सांगली जिल्ह्यात यंदाही कारखान्यांकडून एकरक्कमी एफआरपी नाही

शेतकऱ्यांना एफआरपी तीन टप्प्यांतच देण्याची भूमिका जवळपास निश्चित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर कारखाना जरी कुशल चालत असला तरी, एकरकमी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी अकुशलता दाखवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Even this year, there is no lump sum FRP from factories
Even this year, there is no lump sum FRP from factories

सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. पुढील आठवड्यात गाळपास गती येईल. मात्र, एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याबाबत बोलण्यास तयार नाही. एकरकमी एफआरपी द्यावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असली तरी, शेतकऱ्यांना एफआरपी तीन टप्प्यांतच देण्याची भूमिका जवळपास निश्चित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर कारखाना जरी कुशल चालत असला तरी, एकरकमी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी अकुशलता दाखवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा करून सुमारे आठवड्याचा कालावधी झाला. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील साखर कारखाना एफआरपी बाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, जिल्ह्यात साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केले आहेत. तर काही कारखाने गाळप प्रारंभ करू लागले आहेत.

या गाळप प्रारंभ प्रसंगी विविध कारखान्यांची एफआरपी देण्याबाबतची वेगळी भूमिका समोर येत असल्याचे चित्र आहे. काही कारखानदार म्हणतात की, साखरेची किमान विक्री किंमत ३३५० रुपये असली तरच एकरकमी एफआरपी देता येईल. साखर कारखान्यांनी साखरेची निर्यात केली आहे. त्याचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. शासनाने कारखान्यांना आर्थिक मदत करावी, बॅंकांनी कर्जपुरवठा करावा, असा सूर कारखानदारांकडून येत आहे. गाळप हंगामाचा प्रारंभ करताना, एफआरपीचा मुद्दाच बाजूला ठेवला जात असल्याचे चित्र आहे. केवळ यंदा गाळप अधिकाधिक कसे करता येईल याचा विचार साखर कारखानदार करू लागले आहेत.  

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगाम सुरू झाला होता. त्यावेळी सुमारे दीड महिन्यानंतर कोणत्याही साखर कारखान्यांनी एफआरपी देण्याचे नाव काढले नाही. शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते. ऊस गाळपाला गेला तरी, हाती मात्र पैसा नाही अशी बिकट स्थिती झाली होती. यंदाच्या गाळप हंगामात गतवर्षीसारखीच एफआरपी देण्यासाची कारखानदार अडचणी निर्माण करणार का? असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे लक्ष सध्या जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लक्ष्मीफाट्या जवळ रास्ता रोको करण्यात आला होता. स्वाभिमानीचे कार्यकर्ते एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी बैठका घेऊ लागले आहेत. परंतु एकरकमी एफआरपी देण्यासाठी स्वाभिमानी रस्त्यावरची लढाई करणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com