Agriculture news in marathi Eventually citrus growers started getting insurance refunds | Agrowon

अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा मिळणे झाले सुरू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी उत्पादकांना २०१९ २० मधील मोसंबी पिकाच्या आंबिया बहारासाठी उतरविलेल्या विम्याचा परतावा मिळणे सुरू झाले आहे.

जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी उत्पादकांना २०१९ २० मधील मोसंबी पिकाच्या आंबिया बहारासाठी उतरविलेल्या विम्याचा परतावा मिळणे सुरू झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला ॲग्रोवनने प्रकर्षाने बाजू मांडून वाचा फोडण्याचे काम केले होते. 

यासंदर्भात अधिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना २०१९ -२० मधील मोसंबी फळ पिकाच्या आंबिया बहारासाठी उतरविलेल्या विम्याची प्रतीक्षा होती. आंबिया बहारासाठी विमा उतरविलेल्या पिका पैकी डाळिंबाचा पीक विमा परतावा मिळाला. परंतु मोसंबीचा विमा मंजूर होऊनही मिळत नव्हता. यासंदर्भात मोतीगव्हाण येथील शेतकरी प्रताप मोहिते यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठून निवेदन सादर केले होते. 

मंजूर झालेला मोसंबीचा पीकविमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा, व विमा देण्यासाठी विमा कंपनीला बाध्य करण्यात यावे, अशी मागणी मोहिते यांनी निवेदनातून केली होती. यासंदर्भातील वृत्त ॲग्रोवनमधून प्रकाशित झाल्यानंतर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विमा परतावा मिळावा म्हणून हालचाली गतिमान करण्यात आल्या होत्या. 

अखेर १७ एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतीक्षेतील विमा परतावा जमा होणे सुरू झाल्याची माहिती या प्रकरणातील निवेदनकर्ते प्रताप मोहिते व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. जवळपास सहा हजार आठशे शेतकऱ्यांना हा विमा परतावा मिळत असल्याचे श्री. मोहिते म्हणाले. तर घनसावंगी मंडळात हेक्‍टरी २६ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचेही मोहिते यांनी स्पष्ट केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...