गावांनी स्वयंपूर्ण बनावे : पंतप्रधान मोदी 

ग्रामपंचायती लोकशाहीच्या केंद्रबिंदू आहेत. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंच्यातींनी स्वयंपूर्ण होणे आवश्‍यक आहे.
Narendra modi
Narendra modi

नवी दिल्ली: ग्रामपंचायती लोकशाहीच्या केंद्रबिंदू आहेत. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंच्यातींनी स्वयंपूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा आणि राज्यांनी त्यांच्या पातळीवर हे साध्य केल्यास झाल्यास संपुर्ण देश स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. प्रत्येक देशाने स्वयंपूर्ण असणे आवश्‍यक असल्याचा सर्वात मोठे धडा आपल्याला कोरोना महामारीने दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.  पंचायतराज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांबरोबर शुक्रवारी (ता.२४) व्हिडिओ कॉन्फर्न्सद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, देशात संसाधने कमी असली, समस्या असल्या तरीही नागरिकांनी आत्मघाती निर्णय न घेता आव्हान काळजीपूर्वक घेतल्यास देश स्वयंपूर्ण बनतो. हा धडा आपल्याला कोरोना महामारीने दिला आहे. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावांनी स्वयंपूर्ण बनावे. तसेच जिल्हे आणि राज्ये स्वयंपूर्ण झाल्यास देश स्वयंपूर्ण बनेल. यावेळी पंतप्रधानांनी गावांना सोशल डिस्टन्स राखण्यासाठी ‘दो गज दूरी’चा मंत्र दिला. भारत कोरोनाशी कशाप्रकारे लढत आहे, याची चर्चा आज जागतिक पातळीवर होत आहे. याचे श्रेय सर्वसामान्य नागरिकांना जाते.  ‘‘कोरोनाशी लढताना अनेक समस्या आहेत परंतु नविन विचारांसह, ऊर्जा आणि दिशेने देशाला पुढे नेण्याचे काम सुरु आहे. केवळ सोशल डिस्टन्सनेच या महामारीवर विजय मिळविता येऊ शकतो. प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंबाने ‘दो गज की दूर’ पाळली पाहिजे. सर्वांनी मास्क वापरावे. ते महागडेच असावे असे नाही. रुमालापासून बनविलेले मास्कही आपण वापरू शकतो,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले.  ‘‘आयुषमान भारत योजनाच्या माध्यमातून देशातील एक कोटी लोकांना इस्पितळात मोफत उपचार मिळाले आहेत. गावांमध्ये सॅनिटायझेन, शहरांतून गावात येणाऱ्या नागरिकांसाठी कॉरेंटाईन सेंटर निर्मिती, गरजू लोकांना अन्न वितरण आणि जागरूकतेचे काम अविरतपणे सुरु आहे. गावांतील नागरिकांनी आपल्या उत्पादनांना चांगला दर मिळावा साठी ई-नाम आणि जीईएम यासारख्या ऑनलाइन साधनांचा वापर करावा,’’ असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. 

सव्वा लाख ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबॅन्ड  देशातील ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबॅन्ड सेवा पोचली आहे आणि कॉमन सर्व्हिसेस सेंटर असलेल्या गावांची संख्या तीन लाखापेक्षा अधिक आहे. याचा फायदा गावांतील लोकांना होत असून त्यांना सेवा देणे सोपे होत आहे. गावांच्या विकासातूनच देशाचा विकास होत असून लोकशाही बळकट होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

ई-ग्रामस्वराज पोर्टलचे अनावरण  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-ग्रामस्वराज पोर्टल, मोबाईल ॲप्लीकेशन आणि स्वामित्व योजनेचे अनावरण केले. ‘‘ई-ग्रामस्वराज पोर्टलमुळे ग्रामपंचायतींना विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आणि राबविण्यासाठी मदत होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर डिजिटायजेशन होणार आहे. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील संपत्तीवरील आराखडा, कर संकलन आणि मालकी हक्काविषयीची स्पष्टता येणार आहे. या संपत्तीवर मालकाला कर्जे काढता येईल. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सहा राज्यांमध्ये राबविली जाणार आहे.  पंतप्रधान म्हणाले... 

  • कोरोना संकटाने स्वयंपूर्णतेचा धडा दिला 
  • ‘दो गज कि दूरी’ मंत्र पाळावा 
  • ‘आयुष्यमान’ योजनेचा एक कोटी लोकांना लाभ 
  • गावे सॅनिटाईज करण्याचे काम अविरतपणे सुरु 
  • शेतमाल, उत्पादने विक्रीसाठी ई-नाम आणि जीईएम वापर करावा 
  • ई-ग्रामस्वराज पोर्टलमुळे गावांच्या विकासाला दिशा मिळेल 
  • स्वामित्व योजनेमुळे संपत्तीवरील मालकीविषयी स्पष्टता येईल 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com