प्रत्येक गावांनी पाण्याचे  अंदाजपत्रक तयार करावे ः डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  Every village has water Prepare budget: Dr. Mallinath Kalashetti
प्रत्येक गावांनी पाण्याचे  अंदाजपत्रक तयार करावे ः डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  Every village has water Prepare budget: Dr. Mallinath Kalashetti

प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करावे ः डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी 

गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी यांचे अंदाजपत्रक करणे काळाची गरज बनली आहे, असे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी यांचे अंदाजपत्रक करणे काळाची गरज बनली आहे. ज्या गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक केले आहे. त्या गावातील नागरिकांना चांगला फायदा झाला आहे. मात्र, ही संख्या मर्यादित असून, प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नेहरू युवा केंद्र आणि ग्रामीण तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅच द रेन’ आणि ‘भूजल योजने’ च्या जनजागृती कार्यक्रम अभियानाचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१८) उद्घाटन झाले. त्यावेळी कलशेट्टी यांनी मत व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, भूजल विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद देशपांडे, सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहिते, एनएसएसचे विभागीय संचालक डॉ. डी. कार्तिकेयन, ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम, संचालक शरद पाबळे आदी उपस्थित होते. कलशेट्टी म्हणाले, ‘‘भूजल वाढविण्यासाठी कॅच द रेन हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे भूजलसंबधी नागरिकांमध्ये जनजागृती होऊन पाणी पातळी वाढविण्यास मदत होईल. हे करत असताना पाण्याचे व्यवस्थापनही तेवढेच महत्त्वाचे आहे.

भूजल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अटल भूजल योजनेत कॅच द रेन पासून पाणी जिरविण्यासाठी लागणारे स्ट्रक्चरवर भर देण्यात येत आहे. पडलेल्या पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरले जाणार आहे. या शिवाय ठिबक, तुषार सिंचन, मल्चिंग यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून पाण्याची मोठी बचत होणार आहे. गावांचे अंदाज पत्रक तयार करताना आपणाला गावातील सर्व पिकांची माहिती, लागणारे पाणी यांची सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी जनजागृती खूप महत्त्वाची आहे. पाणी क्षेत्रात अनेक व्यक्ती, विभाग काम करीत आहेत. मात्र, आज तीन ते चार विभाग एकत्र येऊन जनजागृती करीत आहे. विशेष: हा युवा वर्ग पुढे येऊन यामध्ये काम करीत असल्याने निश्चितच पाण्याची बचत होईल.’’ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, ‘‘ पाण्याची उपलब्धता खूप आहे,  परंतु आवश्यक तिथे उपयोग होत नाही. पाण्याचा अपव्यय अधिक होत आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा सारखे अनेक उपक्रम राबविले  जात असले तरी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.’’ ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी प्रास्ताविक केले. एनएसएसचे विभागीय संचालक डॉ. डी. कार्तिकेयन यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com