मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी एकत्रित काम करावे ः दानवे

औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सर्वांनी एकत्रितपणे मराठवाडा पाणी प्रश्नावर काम करण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
Everyone should work together on the water issue of Marathwada: Danve
Everyone should work together on the water issue of Marathwada: Danve

औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सर्वांनी एकत्रितपणे मराठवाडा पाणी प्रश्नावर काम करण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. 

मराठवाडा पाणी परिषदेतर्फे शनिवारी (ता.३०) आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह पाणी परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. परिषदेत बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, उपाध्यक्ष मनोहर सरोदे, मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश पांडव, शंकरराव नागरे, डॉ भगवानराव कापसे, कल्पणा मोहिते-निकम यांनी भाग घेतला. 

दानवे म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने मराठवाडा पाणी परिषदेने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सिंचन विषयक अनुशेष व जल विषयक प्रलंबित योजना पूर्ण करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत.’’ 

डॉ. पांडव म्हणाले, ‘‘जल स्वयंपूर्ण गावाकरिता प्राधान्य दिले पाहिजे. एकात्मिक जलनीती हे प्रभावी माध्यम आहे. जल व्यवस्थापनात लोकसहभागाला विशेष महत्त्व आहे.’’ 

नागरे म्हणाले, ‘‘या पाणी परिषदेमुळे मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला वाचा फुटली आहे. नदी खोरेनिहाय जलव्यवस्थापन व आंतर खोरे पाणी परिवहन योजना राबविल्या शिवाय मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होणार नाही.’’ 

डॉ. कापसे म्हणाले, ‘‘आपल्याकडील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. हे टाळून पाण्याचा कार्यक्षम व पुनर्वापर करण्याची आवश्यकता आहे.’’ 

प्रा. गजानन सानप, दामू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोहर सरोदे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश बागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कल्पना मोहिते-निकम, विष्णू पिवळ, अंकुश पवार, विकास कांबळे, अपर्णा सावळे, मुक्ताराम सोनवणे, परशुराम कुलकर्णी, सिद्राम डोंगरे सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com