निर्मल सीड्सचे संस्थापक माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे निधन

निर्मल सीड्सचे संस्थापक माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे निधन
निर्मल सीड्सचे संस्थापक माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे निधन

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे माजी आमदार आणि निर्मल सीड्स कंपनीचे संस्थापक आर. ओ. पाटील यांचे मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (ता. २८) पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.  जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मूळचे अंतुरली येथील रहिवासी असलेले आर. ओ. पाटील यांनी नव्वदच्या दशकात निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली हाती. महाराष्ट्रासह विविध राज्य शाखा कार्यरत आहेत. शेती आणि शेतकरी यांच्याविषयी तळमळ असलेल्या आर. ओ. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळांचे आयोजन केले. १९९९ मध्ये पाचोरा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा पाटील हे शिवसेनेकडून आमदार म्हणून विजय झाले. त्यानंतर २००४ मध्येदेखील विजय मिळवला होता. अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा आहे. महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणूनही त्यांनी सुमारे दहा वर्षे काम पाहिले. फेब्रुवारी २०१९ मध्ये अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्ह्यात आर. ओ. पाटील यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com