माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन

माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन
माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन

अकोला : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहकार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव रामराव धोत्रे यांचे शुक्रवारी (ता.१०) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काँग्रेसचे ज्येष्ठे व सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणारे वसंतराव धोत्रे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पळसो बढे येते १४ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला होता. सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविले आहे. गेले काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर येथील आेझोन रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या तापडियानगर येथील घरून काढण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरिष धोत्रे हा मुगला आणि दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. देशातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकिर्द आहे. अमरावती येथे मुख्यालय असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ते दहा वर्ष अध्यक्ष होते. बोरगाव मंजू (आताचा अकोला पूर्व) विधानसभा मतदारसंघातून ते १९८४ मध्ये आमदार झाले होते. १९८६ ते १९८८ या काळात शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार राज्यमंत्री होते. ..................... अल्प परिचय जन्म ः १४ फेब्रुवारी १९३७ गाव ः पळसो (बढे) अकोला शिक्षण ः नागपूर विद्यापीठातून बी.कॉम. ची पदवी सामाजिक व राजकीय कारकिर्द १९६० साली सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. १९६५ ते १९८६ असे २१ वर्षे त्यांनी अकोला सहकारी जिनींग प्रेसींग फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. १९६७ ते १९८५ अशी १९ वर्षे ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९६५ ते १९८६ या २१ वर्षाच्या कालावधित त्यांनी अकोला जिल्हा कुक्कुट विकास सहकारी संस्था लिमिटेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. १९७१ ते १९८६ या पंधरा वर्षात त्यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. १९८५ ते १९९० विधानसभा सदस्य (आमदार बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघ) १९८७ ते १९९४ या कालावधित कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक. १९८५ ते १९९८ अशी १३ वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक. १९८६ ते १९८८ महाराष्ट्र राज्याचे (सहकार व वने) राज्यमंत्री १९८९ ते १९९३ महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष. १९८९ ते १९९७ पर्यंत अकोला जिल्हा सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या उपाध्यक्ष. १९९१ ते २००१ अशी दहा वर्षे दि निळकंठ सहकारी सूत गिरणी लिमिटेड अकोलाचे ते अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी विणकर संस्था महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक होते. १९९३ ते २००० या कालावधित ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे संचालक होते. १९९४ ते २००२ या आठ वर्षात त्यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. १९९७ ते २००२ ते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे संचालक होते. १९९१ ते १९९३ या तिन वर्षात त्यांनी इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर को-आॅप.लिमिटेड न्यू दिल्लीचे संचालक १९९७ पासून दहा वर्षे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती या संस्थेचे अध्यक्ष.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com