राज्यातील पावणेतीन लाख जलस्रोतांची पाणीतपासणी 

ग्रामीण भागात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांची वर्षातून दोनदा तपासणी होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी विभागाकडून एप्रिलपासून दोन महिने राज्यात जलस्रोत पाणीतपासणी मोहीम सुरू केली जात आहे.
water examination.
water examination.

नगर ः ग्रामीण भागात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांची वर्षातून दोनदा तपासणी होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी विभागाकडून एप्रिलपासून दोन महिने राज्यात जलस्रोत पाणीतपासणी मोहीम सुरू केली जात आहे. राज्यात २ लाख सत्तर हजार जलस्रोतांच्या पाण्यातील आठ घटक तपासले जाणार आहेत. त्यानंतर पाण्यातील घटकाच्या कमी-जास्त प्रमाणानुसार उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

ग्रामीण भागात पिण्यासाठी विहिरी, हातपंप, विंधन विहिरीं पिण्यासाठी वापरल्या जातात. बहुतांश गावांत अजूनही पाणी शुद्धीकरण यंत्रणा नाही. पिण्याच्या पाण्यातील घटकांचे प्रमाण कमी-जास्त असले, तर त्याचा आरोग्यावर परिणाम होते. दर महिन्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी केली जाते तर पाणी व स्वच्छता विभागामार्फत पावसाळ्याआधी व पावसाळ्यानंतर पाण्यातील आठ घटकाची तपासणी केली जाते. पाण्यातील विविध घटक तपासणीसाठी नगर जिल्ह्यात नगर (केडगाव), कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या तपासणी प्रयोगशाळा आहेत.  राज्यात पिण्याचे पाणी वापरले जात असलेल्या जलस्रोतांमधील पाण्याची तपासणी मोहीम १ एप्रिलपासून सुरू होत असून ती ३१ मेपर्यंत सुरू राहील. त्यासाठी जलमित्रांमार्फत पाणी नमुने गोळा केले जात आहेत. त्यासाठी यंदा पहिल्यांदाच ॲपचा वापर केला जात आहे. पाणी भरतानाचे फोटो अपलोड केले जाणार असल्याने पाणी प्रत्यक्ष जलस्रोतांवरील पाणी भरल्याचा पुरावे उपलब्ध होतील. 

अशी होणार तपासणी  राज्यात तपासल्या जाणाऱ्या २ लाख ७० हजार जलस्रोतांत चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार ९७१, सोलापुरात १३ हजार ४२६, गडचिरोलीत १५ हजार ३३८, नगरमध्ये १० हजार ३२६, नांदेडला ११ हजार २९० तपासणी केली जाणारे जलस्रोत आहेत. बागायती पट्टा, नदीकाठच्या भागातील पिण्याच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक आढळत आहे. काही भागांतील पाण्यात फ्लोराईड, नायट्रेटचेही प्रमाण आढळून येते.  हे घटकांची होणार तपासणी  फ्लोराईड, नायट्रेट, आयर्न, अल्कनेटी, पीएच, टीडीएस (क्षार), क्लोराइड, टरब्यटिटी (पाण्यातील गढूळपणा).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com