गुलाबी बोंड अळी उपाययोजनांची केंद्रीय पथकातर्फे पाहणी

गुलाबी बोंड अळी उपाययोजनांची केंद्रीय पथकातर्फे पाहणी
गुलाबी बोंड अळी उपाययोजनांची केंद्रीय पथकातर्फे पाहणी

औरंगाबाद : गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणात राज्याच्या कृषी आयुक्‍तालयाकडून राबविलेल्या उपाययोजना व त्यानंतर मिळविलेल्या नियंत्रणाचा प्रस्ताव पंतप्रधान पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविला होता. या प्रस्तावाची तिसऱ्या टप्प्यासाठी निवड झाल्याने राज्यात नेमकी त्याची स्थिती काय हे जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्राचे अधिकारी गुरुवारी (ता. १४) औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. 

केंद्राच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे उपसचिव एस. सी. पंत तसेच दिल्लीचे शास्त्रज्ञ डॉ. जी. प्रसाद या द्विसदस्यीय पथकासोबत कृषी आयुक्‍तालयातील सुभाष घाडगे, औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, सिल्लोडचे उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. चव्हाण यांची या पथकासोबत उपस्थित होते. 

जळगाव जिल्ह्यातून पाहणी करून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यात दाखल झालेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी बाभूळगाव येथे शेतकरी, क्षेत्रीय कर्मचारी आदींशी संवाद साधला. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी नेमक्‍या काय उपाययोजना राबविल्या गेल्या. त्याचे काय परिणाम दिसून आले. अडचणी कोणत्या आल्या, त्याची सोडवणूक कशी केली. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. 

या गेवराई शेमीचे शेतकरी बाबूराव ताठे, मारूती ताठे, काकासाहेब फरकाडे, त्र्यंबक भडक आदी शेतकऱ्यांनी लागवडपूर्व, लागवडीनंतर व काढणीपर्यंत केलेल्या उपाययोजना, जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, बियाणे उत्पादक कंपन्या, जिनिंग असोसिएशन आदींनी केलेल्या सहकार्याची मार्गदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर सिल्लोड येथील हरिओम जिनिंगमध्ये दिलेल्या भेटीत वेचणीपश्चात प्रक्रिया आणि त्यानंतर घेतलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर फुलंब्री येथील कृषी सेवा केंद्रासमोर जागृतीसाठी लावलेल्या फलकांची पाहणी करून अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. 

सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कृषी विभागाच्या वतीने रामेती मधील सभागृहात अधिकाऱ्यांसमोर गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी केलेले उपाय, त्याचे आलेले परिणाम, मिळविलेले नियंत्रण याविषयीचे सादरीकरण केले गेले. कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठ, सियाम, मोन्सॅन्टो आदींनी या सादरीकरणात सहभाग नोंदविला. या वेळी कृषी विभागाचे अधिकारी, बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, ‘वनामकृवि’चे प्रतिनिधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे आदींची उपस्थिती होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com