मोसंबी बागांची तज्ज्ञांकडून बागांची पाहणी

भीषण दुष्काळी परिस्थितीत फळबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्याला आधुनिक तंत्र, शास्त्राची कार्यक्षम जोड देऊन अधिकाधिक बागा कशा वाचविता येतील, याची माहिती मोसंबी फळबागधारकांना दिली जात आहे. - अंबादास हुचे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, सीसीआरआय, नागपूर
मोसंबी बागांची तज्ज्ञांकडून बागांची पाहणी
मोसंबी बागांची तज्ज्ञांकडून बागांची पाहणी

औरंगाबाद  : मराठवाड्यातील मोसंबी बागांची पाहणी करण्यासाठी लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या (सीसीआरआय) तज्ज्ञांचे पथक बुधवारी (ता.१५) बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यात दाखल झाले. गुरुवारी (ता. १६) हे पथक जालना, तर शुक्रवारी (ता. १७) औरंगाबाद जिल्ह्यातील मोसंबी बागांची पाहणी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र जवळपास ४९ हजार हेक्‍टर असल्याचे फळपिकांचे क्षेत्रविषयक आकडे सांगतात. प्रत्यक्षात २०१२ पासून सतत मोठ्या प्रमाणात आलेल्या दुष्काळाच्या संकटाने मोसंबीच्या बागांना तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. टॅंकरने विकतचे पाणी घेऊन बागांना पाणी घालवून वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. आजवरच्या दुष्काळाच्या तुलनेत यंदा परिस्थिती अतिशय भीषण आहे. यंदा खरीप, रब्बी हंगाम हातचा गेला. त्यात आता टॅंकरने विकत घेऊन बागा जगविणे बहुतांश शेतकऱ्यांना शक्‍य होत नसल्याचे चित्र आहे. 

अनेकांनी बागा सोडून दिल्या. काहींनी वाळून गेलेल्या बागा तोडून टाकल्या. दुष्काळाचे संकट प्रचंड भीषण आहे. अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून बागा कशा वाचविता येतील, याविषयी हे पथक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. 

या पाहणी, प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनपर दौऱ्याअंती मराठवाड्यातील लिंबूवर्गीय फळपिकांचे नेमके क्षेत्र, दुष्काळामुळे त्याला बसलेला फटका, बचावासाठी प्रात्यक्षिकातून सांगितलेले उपाय, या विषयीचा अहवाल सीसीआरआयद्वारे आयसीआरला पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या पथकाने बुधवारी (ता. १५) गेवराई तालुक्‍यातील पाडळशिंगी, तलवाडा आदी परिसरांतील मोसंबी बागांची पाहणी केली. सीसीआरआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अंबादास हूचे यांच्यासह हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. एम. बी. पाटील यांचा या पथकामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com