परीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षा, सीईटीचे वेळापत्रक नव्याने : सामंत

मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षा कक्षाचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. या परीक्षा रद्द होणार नाहीत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी जाहीर केले.
परीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षा, सीईटीचे वेळापत्रक नव्याने : सामंत
परीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षा, सीईटीचे वेळापत्रक नव्याने : सामंत

मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षा कक्षाचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. या परीक्षा रद्द होणार नाहीत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी जाहीर केले. शिक्षण मंत्र्यांनी आज सकाळी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी कक्षाकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करून घेण्यात येथील. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील १३ विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, सीईटी कक्षाचे आयुक्त संदीप कदम आदी सहभागी झाले होते.

शिक्षण मंत्री म्हणाले..

  • अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारांच्या चाचण्यांसाठी बहुउद्देशीय प्रयोगशाळा सुरू करा
  • अशा प्रयोगशाळांसाठी राज्य सरकारकडून सर्व परवानग्या देणार
  • आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत
  • सर्व खासगी विद्यापीठांची व्हिडिओ कॉन्फरन्सही लवकरच घेणार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com