agriculture news in marathi excellent orchard of 200 ber trees | Agrowon

बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 23 जानेवारी 2020

ढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी तीस वर्षांपूर्वी लावलेली बोरांची बाग अत्यंत श्रमपूर्वक जोपासली आहे. सुमारे २०४ झाडांचे यशस्वी व उत्कृष्ट संगोपन केल्यानेच प्रतिझाड दोनशे किलोच्या संख्येने भरभरून उत्पादन ही बाग देते आहे. मेहरूणी व कडाका अशा या दोन वैशिष्ट्यपूर्ण वाणांची चितळकरांची बोरे जिल्ह्यासह, पुण्यापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत.

ढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी तीस वर्षांपूर्वी लावलेली बोरांची बाग अत्यंत श्रमपूर्वक जोपासली आहे. सुमारे २०४ झाडांचे यशस्वी व उत्कृष्ट संगोपन केल्यानेच प्रतिझाड दोनशे किलोच्या संख्येने भरभरून उत्पादन ही बाग देते आहे. मेहरूणी व कडाका अशा या दोन वैशिष्ट्यपूर्ण वाणांची चितळकरांची बोरे जिल्ह्यासह, पुण्यापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत.

येथे सुखदेव कचरू चितळकर यांची शेती आहे. वडील कचरू यांच्यासह नारायण, तुकाराम आणि केरू असा तीन चुलत्यांचा परिवार. चौघा भावांची मिळून साठ एकर बहुतांश माळरानाची शेती. पाण्याची कमतरता. त्यामुळे बरीच शेती पडीक असायची. जी कसली जायची तीदेखील पावसावर अवलंबून. सन १९९० मध्ये कृषी विभागाने पडीक जमीन सुधार योजना राबवली. त्या योजनेतून सुखदेव यांच्या वडिलांना तत्कालीन कृषी सहायक स्व. फलके यांनी फळझाडे लावण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चितळकर परिवाराने चिंच, बोर, पेरू व आंबा यांची प्रत्येकी एक हेक्टरवर लागवड केली. पुढील वर्षी गावरान बोरांच्या झाडांवर कृषी विद्यापीठाच्या मदतीने उमराण व कडाका या जातींच्या बोरांचे कलम केले. पाच वर्षांनी पहिले उत्पादन हाती आले. बोरांची विक्री करताना मागणी अधिक असल्याचे जाणवले. तेव्हापासून बोराच्या बागेची जोपासना अत्यंत कुशलतेने सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.

चितळकर यांची बोर बाग

 • सध्या एकूण झाडे- २०४
   
 • झाडांचे अंदाजे वय- २९ ते ३० वर्षे
   
 • वाण- मेहरुणी वाणाची २७ झाडांव्यतिरिक्त अन्य सर्व कडाका वाणाची.
   
 • ग्राहकांच्या मागणीनुसार वाण व त्यातील क्षेत्रात बदल
   
 • प्रतिझाड उत्पादन- २ ते २.५ क्विंटल
   
 • नगर, बीडसह राज्याच्या अनेक भागात चितळकरांच्या बोरांचा बोलबाला
   
 • दर्जेदार उत्पादनासाठी संपूर्ण चितळकर परिवार दिवसभर राबतो.

२५ वर्षांपासून थेट ग्राहक विक्री

 • सुरुवातीला व्यापारी बागेतूनच मागणी करीत. त्या वेळी बाजारातील दरापेक्षा पंधरा ते वीस रुपये दर त्यांनी कमी मागितला. मात्र कमी पैशात विकण्यापेक्षा बाजारात थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला.
   
 • तब्बल पंचवीस वर्षापासून चितळकर बोरांची थेट विक्री करतात.
   
 • दररोजची विक्री- सुमारे २.५ क्विंटल
   
 • आठवड्यातील सातही दिवस नगरमधील पारनेर, घोडेगाव, पुण्यामधील घोडनदी शिरूर, ओतूर, भाळवणी, ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर येथील बाजारात चितळकरांची बोरे हमखास विक्रीला असतात.
   
 • दर (किलोचे)- कडाका- ६० रुपये
   
 • मेहरुणी- ८० रुपये. ही बोरे लहान असतात. मात्र त्यांना मागणी जास्त असल्याने दरही तसेच असतात. त्यांना काटे असल्याने काढणीही अवघड असते.
   
 • गेल्या वर्षी दुष्काळामुळे बोरांना विकतचे पाणी घालावे लागले. त्यामुळे मेहरुणी बोरांची १०० रुपये किलो तर कडाका बोरांची ८० रुपये दराने विक्री केली.

चोख व्यवस्थापन

शेणखताचा वापर

चार भावांचे कुटुंब आता वेगळे झाले असले तरी बोर उत्पादनात खंड पडू दिलेला नाही. सुखदेव
यांचा या शेतीत हातखंडा झाला आहे. ते काही काळ मुंबईत रोजगारासाठी होते. आता पूर्णवेळ शेती पाहतात. घरच्या शेळ्या, मेंढ्या, दुभती जनावरे असल्याने वर्षाला २२ ट्रॉलीपर्यंत शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे शेणखत, गोमूत्र, वापरावर पहिल्यापासून भर आहे. प्रति झाड ४० किलो शेणखताचा वापर होतो.

छाटणीचा प्रयोग

छाटणीचा चार वर्षांपूर्वी व यंदाही प्रयोग केला आहे. दरवर्षी मार्चमध्ये छाटणी केल्यास डिसेंबरमध्ये बोरे विक्रीस येतात. सन २०१५ मध्ये जानेवारीतच छाटणी करून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बोरे विक्रीला आणण्याचा प्रयोग केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. यंदा २४ झाडांची एक मार्चला छाटणी केली. हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे यंदा अधिक काळ विक्री करणे शक्य होणार आहे.

खत व पाणी

केवळ डीएपी व पोटॅश यांचाच वापर होतो. कळी तयार झाल्यावर रासायनिक खतांचा डोस देतात. बुरशीनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे रसायनांचा अत्यंत कमी वापर असलेली ही बोरे आहेत. सध्या प्रति झाड आठवड्यातून दोन वेळेस मिळून २०० लिटर पाणी देतात. ड्रीपचा व प्रसंगी पाटपाण्याचा वापरही होतो. उन्हाळ्यात पानगळीची अवस्था असल्याने पाण्याची गरज भासत नाही.
दोन विहीरी आहेत. मात्र गेल्या वर्षी टंचाई भासल्याने विकतच्या पाण्याने सर्व फळबाग जगवली.
आर्थिक फटकाही बसला.

अन्य उल्लेखनीय

 • एक एकरात गावरान पेरू. त्यांचीही बोरांबरोबर हातविक्री. जंबो पेरूची एक एकरावर लागवडीचे नियोजन -एक एकरात चिंचेची झाडे
   
 • चितळकर यांच्या बोरबागेला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आमदार नीलेश लंके यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना ते मोफत मार्गदर्शनही करतात.

प्रतिक्रिया

कमी पाण्यात उत्कृष्ट नियोजनातून चितळकर यांनी बोरांचे यशस्वी उत्पादन घेत माळरानावर बहर आणला. दुष्काळी भागासाठी हा प्रयोग प्रेरणादायी आहे.
-पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प

व्यवस्थापन नेटाने केले तर बोराची व्यावसायिक शेती यशस्वी करता येते. दुष्काळातही उत्पादनात खंड पडू दिला नाही. याच पिकाने कुटुंबाला स्थैर्य आणले आहे.
-सुखदेव चितळकर
संपर्कः९७६६७०४२५


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...