Agriculture news in marathi Excess rainfall assistance of Rs. 21 crore for Mohol taluka | Agrowon

मोहोळ तालुक्‍यासाठी अतिवृष्टीची २१ कोटी रुपयांची मदत

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

ऑक्‍टोबर महिन्यात मोहोळ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून पहिल्या टप्प्यातील २१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 

मोहोळ, जि. सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मोहोळ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून पहिल्या टप्प्यातील २१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सध्या याद्या पडताळणीचे काम सुरू आहे. ते होताच येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 

 मोहोळ तालुक्‍यात १४  आणि १५ ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नद्या, ओढे, बंधारे यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या संकटामुळे दोन दिवसांतच शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. अनेक दुभती जनावरे वाहून गेली. ज्यांना दावणीवरून सुटता आले नाही, अशांचा जागेवरच मृत्यू झाला. तर घरात पाणी शिरल्याने अनेक घरे जमीनदोस्त झाली होती.

दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी विविध विभागातील १७५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून बाधितांचे तातडीने पंचनामा करण्याचे काम हाती घेतले. सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात जिरायत, बागायत मिळून २३ हजार हेक्‍टर, तर विविध फळबागांचे ८ हजार हेक्‍टरवरील नुकसान झाले आहे. बागायतीमध्ये ऊस, मका, सोयाबीन आदींसह अन्य पिकांचा समावेश आहे. फळबागांमध्ये डाळिंब, सीताफळ, द्राक्ष आदींचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यांना ६३ लाख रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत. तालुक्‍यात झालेल्या नुकसानीसाठी ४५ कोटींचा मदतीचा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील २१ कोटी प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...