Agriculture news in marathi Excess sugar burden on the season this year | Page 2 ||| Agrowon

राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे

राजकुमार चौगुले
गुरुवार, 22 जुलै 2021

यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या वर्षीचा साखरेचा साठा कमी राहणार असला तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या वर्षीचा साखरेचा साठा कमी राहणार असला तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील कारखान्यांना पुढील हंगामाचे स्वागत जादा साखरेचे ओझे घेऊनच करावे लागणार आहे. यंदा उत्पादित साखरेपैकी जवळजवळ निम्मी साखर शिल्लक असल्याने या साखरेचे करायचे काय, असा प्रश्‍न राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांना भेडसावत आहे. 

देशात साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी ८७ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. यापैकी ५० ते ५१ लाख टन साखर फक्त महाराष्ट्रातील शिल्लक राहील, असे चित्र दिसते. यावरूनच महाराष्ट्रात गेल्या वर्षी साखर विक्री कमी झाल्याचे दिसून येते. २०२०-२१ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यात ४० लाख टन साखर शिल्लक होती. यात यंदा १०६ लाख टन साखर उत्पादित झाली. १४६ लाख टन साखर राज्यात होती. यापैकी सुमारे ३५ लाख टन साखर राज्यातून निर्यात झाली. 

सुमारे ३५ लाख टन साखरेची देशांतर्गत बाजारात विक्री झाली. साधारणतः ७० लाख टनांपर्यंत साखर यंदाच्या हंगाम समाप्तीवेळी शिल्लक होती. हंगाम सुरू होईपर्यंत १५ ते २० लाख टन साखर विक्री गृहीत धरल्यास किमान ५० लाख टन साखर शिल्लक राहिला, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. 

यंदा लॉकडाउनचे तर कारण झालेच, परंतु उत्तर प्रदेशने पूर्व ईशान्येकडील बाजारपेठ काबीज केल्याने त्यांनी उत्पादित बहुतांशी साखर त्या भागात विकली. वाहतूक खर्च जादा होत असल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अन्य राज्यात साखर विकणे दुरापास्त झाले, यामुळे साखरेचा उठाव कमी झाला. परिणामी, साखरेची विक्री ठप्प झाली. राज्याच्या तुलनेत उत्तर प्रदेश मध्ये मात्र साखरेची विक्री चांगली झाल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

वाहतूक अनुदान निर्णय प्रलंबितच 
कारखान्यांना साखर वाहतुकीसाठी प्रोत्साहन म्हणून साखरेला प्रतिक्विंटल शंभर रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने राज्य शासनापुढे एप्रिलमध्ये ठेवला होता. हे अनुदान मिळाल्यास राज्यातील साखर कारखान्यांना जलद गतीने साखर देशभरात विक्री करणे शक्य होईल, असा अंदाज आयुक्तालयाचा होता पण अद्यापही यावर शासनाने निर्णय घेतला नाही. कोरोना परिस्थितीमुळे याबाबतच्या निर्णयाला विलंब लागत असल्याचे आयुक्तालय सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया
यंदाच्या हंगामात कारखान्यांना गेल्या वर्षीची शिल्लक साखर आव्हानात्मक ठरणार आहे. विविध कारणांमुळे कारखान्यांना अपेक्षित साखर विकता आली नाही याचे ओझे यंदा नक्की जाणवेल. शिल्लक जलद गतीने विक्री होण्यासाठी तातडीने काही निर्णय अपेक्षित आहेत. 
- विजय औताडे, साखर तज्ज्ञ


इतर अॅग्रो विशेष
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...