agriculture news in Marathi excess supply of Onion due to export ban Maharashtra | Agrowon

निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा; मार्चपासून आवक दाटणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने हटवली नाही तर मार्च महिन्यापासून येऊ घातलेली पुरवठावाढीची समस्या आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. ३१ जानेवारी २०२० अखेर देशात रब्बी (उन्हाळ) कांद्याखालील क्षेत्र ७ लाख हेक्टरवर पोचले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्व प्रमुख कांदा उत्पादक राज्यांत पीक स्थिती ठिकठाक असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने हटवली नाही तर मार्च महिन्यापासून येऊ घातलेली पुरवठावाढीची समस्या आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. ३१ जानेवारी २०२० अखेर देशात रब्बी (उन्हाळ) कांद्याखालील क्षेत्र ७ लाख हेक्टरवर पोचले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्व प्रमुख कांदा उत्पादक राज्यांत पीक स्थिती ठिकठाक असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

२०१८ प्रमाणेच या वर्षीही फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लागणी सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे नवी आकडेवारी जारी होईल, तेव्हा क्षेत्र आणखी वाढलेले असेल. देशात २०१८ मध्ये ५ लाख २० हजार हेक्टरवर कांदा लागणी होत्या. यंदा १ लाख ८० हजार हेक्टरने लागणी वाढल्या आहेत. यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात २ लाख ६७ हजार हेक्टरवर रब्बी कांदा लागणी होत्या. त्या तुलनेत यंदा ४ लाख १५ हजार हेक्टरपर्यंत लागणींचे क्षेत्र विस्तारले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील क्षेत्र ५५ टक्क्यांनी वाढले आहे.

यंदाच्या रब्बीतून १८९ लाख टन मिळण्याचे अनुमानही नुकतेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केले आहे. मागील वर्षाच्या रब्बी हंगामाशी तुलना करता उत्पादनात १९ टक्क्यांची वाढ असेल. रब्बीतील माल साठवणयोग्य असतो. येत्या मार्च ते नोव्हेंबरपर्यंत रब्बी मालाची आवक बाजारात राहील. २०१९-२० (जुलै जून) मध्ये खरीप, लेट खरीप व रब्बी मिळून २४४ लाख टनाचे उत्पादन अनुमान आहे.

सध्या लेट खरिपाचा माल बाजारात असून, तुरळक प्रमाणात आगाप रब्बी आवकही सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मार्चमध्ये रांगडा आणि उन्हाळ माल एकाच वेळी बाजारात दाटण्याची शक्यता आहे. संभाव्य पुरवठावाढ संतुलित करण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याशिवाय पर्याय नाही.

कांदा निर्यत घटली 
२०१९ कॅलेंडर वर्षात १४.९ लाख टन कांदा निर्यात झालीय. सप्टेंबरनंतर मालदीवचा अपवाद वगळता संपूर्ण निर्यातबंदी लादण्यात आली. त्यामुळे निर्यातीचा आलेख घसरला. २०१८ कॅलेंडर वर्षात १९.९ लाख टन कांदा निर्यात झाली होती. कांदा निर्यातीतून २०१९ कॅलेंडर वर्षात २ हजार ६५५ कोटींचे तर २०१८ वर्षांत ३ हजार ५१६ कोटी रुपये परकीय चलन मिळाले. निर्यात घटल्याने परकीय चलनरूपी उत्पन्नही घटल्याचे वरील आकडेवारीतून समोर येतेय.

संपूर्ण निर्यातबंदी उठविणे आवश्यक
६ फेब्रुवारीपासून कृष्णपुरम वाणाच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत केवळ दहा हजार टन कांदा चेन्नई पोर्टवरून निर्यात करण्यास परवानगी आहे. विशिष्ट वाणास तेही नियंत्रित प्रमाणात निर्यातीची परवानगी देऊन समस्या सुटणार नसून, संपूर्ण निर्यातबंदी हटवली तरच पुरवठावाढीची समस्या काही अंशी नियंत्रित होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून क्षेत्र आणि उत्पादन वाढीचे अनुमान जाहीर झाल्यानंतरही वाणिज्य मंत्रालयाकडून यासंबंधी का निर्णय लांबणीवर पडलाय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.


इतर बातम्या
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...