Agriculture news in marathi Excessive crop damage due to rains in Nagar areas | Agrowon

नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान सुरुच आहे.

नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान सुरुच आहे. सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या व काढणी केलेल्या बाजरीला बसत आहे. भुईमुग, सोयाबीनचेही नुकसान होत आहे. अजून कापसाला धोका झाला नसला तरी त्याचीही पिवळा पडून पातेगळ, पाणगळ होण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. 

जिल्ह्यात यंदा खरिपाची ६ लाख १७ हजार ६९८ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सर्वाधिक बाजरीची १ लाख ४५ हजार, तर सोयाबीनची ९२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसामुळे पिके जोमात आली. सध्या जिल्ह्यातील बहूतांश भागात बाजरीची काढणी सुरु आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. बाजरीचे मात्र काढणीत नुकसान होत आहे. अनेक भागात बाजरी काढणी करुन लगेच काटणी केली जात आहे. तरी काही ठिकाणी कणसांना कोंब फुटत आहेत. काही भागात खरीप भूईमुग काढणीला आला आहे. मात्र, पाऊस सुरु असल्याने त्यालाही फटका बसत आहे.  

अनेक अडचणी येऊनही यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले. पावसाचा सोयाबीनलाही फटका बसत असून काही ठिकाणी शेंगा जागेवर सडु लागल्या आहेत. यंदा जिल्ह्यात कापसाचे एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा कापूस पीक चांगले असून दोड्या आल्या आहेत. यंदा वाढ चांगली झालेली असल्याने पात्याची संख्याही चांगली आहे. 

शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी 

जिल्ह्यातील राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नगर, पारनरे, नेवासा, शेवगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. आठ दिवसांपुर्वी अनेक भागात वादळी पावसाने पिकांसह ऊस, भाजीपाल्याचे नुकसान केले. पंचनामे केल जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र नुकसानीची सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...