Agriculture news in Marathi Excessive rainfall in 67 circles in Marathwada | Page 3 ||| Agrowon

मराठवाड्यात ६७ मंडळांत अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 सप्टेंबर 2021

दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा कृपा करताना दिसतो आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या सहा जिल्ह्यांतील ६७ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगाबाद : कायम लहरीपणाचा परिचय देणारा पाऊस मराठवाड्यावर गत दोन दिवसांपासून पुन्हा कृपा करताना दिसतो आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या सहा जिल्ह्यांतील ६७ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. विविध तालुक्‍यांत जोरदार पावसाने हजेरी लागली. तर बीड जिल्ह्याला पावसाने धो धो धुतल्याचे चित्र आहे. अनेक मंडळांत जोरदार बरसलेल्या पावसामुळे ओढे, नद्यांना पूर आला. शिवाय अनेक भागांतील शेतशिवारात पाणीच पाणी पाहायला मिळाले.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ७५.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात सरासरी ३९.३७ मिलिमीटर, जालना ३८.४ मिलिमीटर, नांदेड ३७.२ मिलिमीटर, लातूर ३४.३ मिलिमीटर, औरंगाबाद ३०.३ मिलिमीटर, उस्मानाबाद २४.४ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरी १०.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४२ तालुक्‍यांत सरासरी ३० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामध्ये औरंगाबादमधील ४, बीडमधील ११, जालन्यातील ४, उस्मानाबादमधील २, नांदेडमधील ९, परभणीतील ७, लातूरमधील ५ तालुक्‍यांचा समावेश आहे. यापैकी १५ तालुक्‍यांत, तर सरासरी ६० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामध्ये औरंगाबादमधील एका तालुक्‍यासह, बीडमधील ७, जालनामधील २, नांदेडमधील ३, परभणीतील दोन तालुक्‍यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता. जास्त कालावधीच्या पिकांसाठी हा पाऊस दिलासा देणारा असला, तरी काढणीला आलेल्या मूग, उडदासारख्या पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान होते आहे. आधीच पावसाच्या खंडामुळे नुकसानीची कुऱ्हाड कोसळलेल्या शेतकऱ्यांवर या पावसामुळे हातची पीक जाण्याची वेळ आली आहे.

या मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील ९, जालना ८, नांदेड ७, परभणी ५, लातूर ४, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील तलवाडा मंडळात सर्वाधिक २३४.५० मिलिमीटर, तर पिंपळनेर मंडळात २१४ मिलिमीटर पाऊस झाला. अतिवृष्टी झालेल्या एकूण मंडळांपैकी २५ मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १३ मंडळांसह लातूरमधील १, नांदेडमधील ३, परभणीतील ३, औरंगाबादमधील ४ व जालन्यातील एका मंडळाचा समावेश आहे.

पुरामुळे नुकसान

  • औरंगाबाद जिल्ह्यात अंजना, गल्हाटी, वीरभद्रा, पूर्णा नदीला पूर.
  • पळशी खुर्द व पळशी बु. या गावांना कन्नड-सिल्लोड मार्गाला जाणाऱ्या मार्गावरील पूल गेला वाहून
  • औट्रम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प.
  • जालना जिल्ह्यात मांगनी, गल्हाटी नदीला पूर, गल्हाटी प्रकल्प ८० टक्‍के भरला.
  • घनसावंगी (जि. जालना) तालुक्‍यात गोदावरीला पूर.
  • एकाच पावसात माजलगाव धरणात १२ टक्‍के पाणीसाठा वाढला.

इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...