Excessive rainfall in five circles in Jalna district
Excessive rainfall in five circles in Jalna district

जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, हलका, मध्यम, दमदार जोरदार पाऊस झाला. जालना, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत तर औरंगाबाद जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, हलका, मध्यम, दमदार जोरदार पाऊस झाला. जालना, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत तर औरंगाबाद जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

जोरदार पावसामुळे जालना व औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी पीक आडवी झाली. बीड, लातूर  उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र पावसाची हजेरी तुरळक ते हलक्‍या स्वरूपाची होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील बनोटी मंडळात सर्वाधिक ८१ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. त्यापाठोपाठ लाडसावंगी मंडळात ३५.८, सिल्लोड ३४.३, निल्लोड ३६.३, भराडी ३५.८ ,गोळेगाव ३३.३, बोरगाव २८, आळंद २१, पिरबावडा २५ तर वडोदबाजार मंडळात २३ मिलिमीटर झालेला पाऊस वगळता इतर मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४१ मंडळांत पावसाची हलकी मध्यम दमदार ते जोरदार हजेरी लागली.

जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी नोंदल्या गेली. अतिवृष्टी झालेल्या मंडळात सर्वाधिक ९७ मिलिमीटर पाऊस तळणी मंडळात, त्यापाठोपाठ जाफराबाद मंडळात ८२.३, भोकरदन ७३, आष्टी ६८.८ तर पिंपळगाव मंडळात ७२ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील सिपोरा मंडळात ४३.७, धावडा ४३.७, हसनाबाद ४३.५, राजुर २९.८, केदारखेडा ४३.७, कुंभारझरी ३६, टेंभुर्णी ४५.५, जालना शहर २०.५, जालना ग्रामीण २२.३, विरेगाव २२, पाचनवडगाव ३०, परतुर ३८.४ ,श्रीष्टी ५६.८, सातोना २२, शेळगाव २६.३, तर रांजणी मंडळात ५०.३, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर मंडळांत तूरळक ते हलका पाऊस नोंदला गेला.

रात्रीत तलाव भरला, पिके भुईसपाट जालना जिल्ह्यातील केदारखेडा परिसरात रविवारी (ता. १३) अचानक रात्री साडेआठ वाजता ढगांचा गडगडाट, वाऱ्यासह दहा वाजेपासून ते एकच्या दरम्यान धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली. परिसरातील केदारखेडा, बामखेडा, वालसा, डावरगाव, बंरजळा, गव्हाण, तोडोळी, देऊळगाव ताड, बोरगाव तारू, जवखेडा, नळणी शिवारात धुव्वाधार पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. मक्का, कपाशी आडवी झाली. काढणीला आलेल्या बाजरी, हायब्रीड ज्वारीचे पिके ही जमीनीला लोळवण घेत नुकसान झाली. तीन तास पडलेल्या धुवाधार पावसाने घरांची पडझड झाली. गिरजा-पुर्णा पात्र ही आलेल्या पावसाने दुथडी वाहत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com