धुळे जिल्ह्यातील नंदाळे येथे अतिवृष्टी

कापडणे, जि. धुळे ः नंदाळे बुद्रुक (ता. धुळे) येथे रविवारी (ता. २८) पहाटे साडेतीनच्या सुमारास ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली. यामुळे साप नाल्याला मोठा पूर आला व पुराचे पाणी गावात शिरले. तसेच गावातील सुमारे दीडशे एकर शेती शिवारातही पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. याचा ८० ते ९० शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पावसामुळे पाच घरांची पडझड झाली.
Excessive rainfall at Nandale in Dhule district
Excessive rainfall at Nandale in Dhule district

कापडणे, जि. धुळे ः नंदाळे बुद्रुक (ता. धुळे) येथे रविवारी (ता. २८) पहाटे साडेतीनच्या सुमारास ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली. यामुळे साप नाल्याला मोठा पूर आला व पुराचे पाणी गावात शिरले. तसेच गावातील सुमारे दीडशे एकर शेती शिवारातही पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. याचा ८० ते ९० शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पावसामुळे पाच घरांची पडझड झाली.

गाव तलावाच्या सांडव्याजवळील मातीच्या बांधातून गळती सुरू झाल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. आजच्या पावसामुळे दोन वर्षांपूर्वी नंदाळे येथे झालेल्या ढगफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या. नंदाळे बुद्रुकचे ग्रामस्थ पहाटे साखरझोपेत असताना साडेतीनच्या सुमारास गावासह परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली.

तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या अतिवृष्टीमुळे गाव परिसरातील ब्रिटिशकालीन तलाव ओसंडून वाहिला. यामुळे साप नदीवजा नाल्याला मोठा पूर येऊन गावातूनच वाहणाऱ्या या नाल्याचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. यातच वीजपुरवठा बंद झाल्याने काय करावे हेच ग्रामस्थांना सूचत नव्हते. यात महिला, लहान मुलांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली.

अतिवृष्टीमुळे शेतकरी सुनील पंढरीनाथ पाटील, हरिदास चुडामण पाटील, दिलीप बाबूलाल पाटील, शिवराम रामभाऊ पाटील, गोरख धर्मा पाटील, साहेबराव निंबा पाटील, भिकन नारायण पाटील, सुरेश चिंतामण पाटील, छबीलाल पाटील, रामभाऊ पाटील, दिनेश उत्तम पाटील, प्रताप साहेबराव पाटील, जितेंद्र संभाजी पाटील, विजय नामदेव पाटील, शिवलिंग पाटील, बाजीराव पाटील, अजबराव पाटील, जिभाऊ पाटील आदी ८० ते ९० शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

विठ्ठल देवराम पाटील, नाना रामभाऊ पाटील, देविदास चुडामण पाटील, विश्वास परशुराम पाटील, भीमराव भिला पाटील यांच्या घरांचीही पडझड झाली. नाल्याला आलेल्या पुरात एक बैलगाडी वाहून गेली. खळ्यांमध्ये पाणी शिरल्याने चाऱ्याचेही नुकसान झाले.

धुळे तालुक्‍यात रविवारी (ता. २८) झालेला मंडळनिहाय पाऊस (अनुक्रमे रविवारचा पाऊस व एकूण मिमीमध्ये) धुळे- ५२, ३५२, लामकानी- १३, ८२, सोनगीर- ००, १३६, नगाव- ४०, २२७, कुसुंबा- १०, २८०, नेर- ००, २८६, मुकटी- ०४, ८५, बोरकुंड- ५४, १९४, पुरमेपाडा- ३९, ३७८, खेडे- २६, ३९८, विंचूर- ६५, २३९, नवलनगर- १०, १५६, एकूण- ३१३ (२८१३), सरासरी- २६.८३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com