नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणार
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्प्यातील २५० कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आठवड्यापूर्वीच मिळाला आहे.
सोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्प्यातील २५० कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आठवड्यापूर्वीच मिळाला आहे. आता हा निधी तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असून, आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्याचे वाटप केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याला अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला होती. जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भेट देऊन या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्याला या नुकसानीपोटी ५०१ कोटी ४३ लाख रुपयाचा रुपयांचा निधी मंजूर केला होता.
त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५१ कोटी रुपये मिळाले होते. त्यातून काही ठराविक गावांनाच ही मदत वाटप करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी ६८ लाख रुपयांची मदत जिल्ह्याला मिळाली.
आता शासनाने जाहीर केल्यानुसार खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी २ हेक्टरपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये आणि फळपिकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मदत तत्काळ जमा करण्याचे आदेश
जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. आठवडाभरात ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, त्यास विलंब करू नये, असे आदेश मिलिंद शंभरकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
तालुकानिहाय मिळणारी मदत
- -उत्तर सोलापूर- १० कोटी १५ लाख रुपये
- -दक्षिण सोलापूर- १२ कोटी ८६ लाख रुपये
- -अक्कलकोट- २२ कोटी ७७ लाख रुपये
- -बार्शी- ४० कोटी ४८ लाख रुपये
- -माढा- २७ कोटी ४८ लाख रुपये
- -करमाळा- ९ कोटी ८० लाख रुपये
- -पंढरपूर- ४८ कोटी ९६ लाख रुपये
- -मंगळवेढा- २० कोटी ३६ लाख रुपये
- -सांगोला- ४० कोटी ५२ लाख रुपये
- -मोहोळ- १७ कोटी ३० लाख रुपये
- 1 of 1096
- ››