Agriculture news in marathi Excessive rains, flood victims should complete the panchnama immediately | Agrowon

अतिवृष्टी, पूरबाधितांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा: विजय  वडेट्टीवार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन एकही शेतकरी सुटणार नाही, याची खबरदारी घेत त्या संदर्भातील संपूर्ण अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील पंचनामे पूर्ण करताना शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन एकही शेतकरी सुटणार नाही, याची खबरदारी घेत त्या संदर्भातील संपूर्ण अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. 

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित गावांसोबतच रस्ते, शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषानुसार तयार करून पाठविल्यास झालेल्या नुकसानीसंदर्भातील निधी संबंधित जिल्ह्याला तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीसंदर्भातील संपूर्ण अहवाल प्राधान्याने सादर करावेत, असे ‍निर्देशही यावेळी वडेट्टीवार यांनी दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील पूर परिस्थिती व झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय आढावा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीस विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., वर्धाच्या ‍जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडाऱ्याचे संदीप कदम, दूरदृष्य प्रणालीद्वारे गोंदियाच्या नयना गुंडे, गडचिरोलीचे दीपक सिंघला, चंद्रपूरचे अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महसूल उपायुक्त मिलींद साळवे, तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जीवित व वित्तहानी झाली असून, शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या कुटुंबांना मदत देताना कोकणात तसेच इतर भागात करण्यात आलेल्या मदतीच्या निकषानुसारच विदर्भातील बाधित कुटुंब व शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीसंदर्भातील अहवाल तयार करुन शासनाला सादर करावेत, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिलेत. पुरामुळे कायमस्वरुपी बाधित होणाऱ्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यासाठी गावनिहाय प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचे जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करुन यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांमार्फत करण्यात यावी. तसेच मागील वर्षी सुद्धा खराब झालेल्या रस्त्यांचा समावेश करावा. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातील प्रलंबित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. पुरामुळे बाधित होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव सादर करताना ‘एसडीआरएफ’च्या निकषाची पूर्तता करावी. या निकषानुसारच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
 


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...