अतिवृष्टीचा ७१ हजार हेक्टरवरील पिकांना फटका  Excessive rains hit crops on 71,000 hectares
अतिवृष्टीचा ७१ हजार हेक्टरवरील पिकांना फटका  Excessive rains hit crops on 71,000 hectares

सोलापूर : अतिवृष्टीचा ७१ हजार हेक्टरवरील पिकांना फटका 

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

सोलापूर : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे ३२२ गावांतील ९७ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या ७० हजार ९०३ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये जिरायत ५१ हजार १९० हेक्टर तर बागायत १६ हजार १७८ आणि ३५३५ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  गेल्या आठवड्यात सलग तीन-चार दिवस पाऊस पडला. त्यात सोयाबीन, तूर, उडीद, मूग या सारखी खरीप पिके काळवंडून गेली आहेत. हातातोंडाला आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. आता मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. काहीजण विमा कंपनीकडे तक्रार करून वाट पाहत बसले आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा व बार्शी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात ४१ गावांतील २३ हजार ४७३ शेतकऱ्यांचे ६७७५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात ४७ गावांमध्ये ५६०१ शेतकऱ्यांचे ३७६१ हेक्टर पिकांचे, अक्कलकोट तालुक्यात १२ गावांतील ७३० शेतकऱ्यांचे ५९४ हेक्टर, मोहोळ तालुक्यातील ४८ गावांतील १० हजार ५८२ शेतकऱ्यांचे १२ हजार १०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. माढा तालुक्यात ३७ गावांतील १२९४ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. २९०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक १३७ गावांतील ५५ हजार ९५४ शेतकऱ्यांचे ४४ हजार ७६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

पंचनाम्याचे आदेश  गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नजरअंदाज अहवालही प्रत्येक तालुकास्तरावर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही तालुक्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. नजरअंदाज अहवालातून नुकसानीची प्राथमिक माहिती हाती मिळाली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकसानीचेही पंचनामे करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com