गरजेपेक्षा जास्ती युरिया वापरानेच टंचाई ः जगताप यांचा दावा

नगर ः युरिया खताची अजिबात टंचाई नाही. पाहिजे तेवढे खत उपलब्ध आहे. मात्र, शेतकरी गरजेपेक्षा जास्ती खत वापरत असल्याने टंचाई निर्माण होत आहे, असा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केला.
Excessive use of urea only causes scarcity: Jagtap claims
Excessive use of urea only causes scarcity: Jagtap claims

नगर ः युरिया खताची अजिबात टंचाई नाही. पाहिजे तेवढे खत उपलब्ध आहे. मात्र, शेतकरी गरजेपेक्षा जास्ती खत वापरत असल्याने टंचाई निर्माण होत आहे, असा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केला. केवळ युरियाच्या वापरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे युरियासोबत इतर खत घ्यायला लावले म्हणजे ती लिंकिंग होत नाही तर इतर खत घेणेही गरजेचे असल्याचे जगताप म्हणाले. 

नगर जिल्ह्यामध्ये सध्या युरिया मिळत नाही, चढ्या भावाने विक्री करतात, युरियासोबत इतर खते घ्यायला लावले जात असल्याच्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी खत मिळण्यासाठी रांगा लावत असून कृषी विभाग मात्र खत विक्रेत्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप होत आहे. 

याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अ्धिकारी जगताप यांना विचारले असता त्यांनी युरियाची टंचाई होण्याला शेतकरी कारणीभूत असून गरजेपेक्षा जास्ती युरियाचा वापर करत असल्याचा दावा त्यांनी केला. मूग, उडीद, सोयाबीन, तुरीला युरियाची गरज नाही. बाजरीला, हेक्टरी तीस किलो, मक्याला हेक्टरी ८० किलो युरियाचीच गरज आहे. या वापरानुसार युरिया वापरला तर सध्या उपलब्ध असलेला युरिया पुरेसा आहे. मात्र, शेतकरी इतर खते देत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांनी जर इतर खत घ्यायला लावले तर ती लिंकिंग म्हणता येणार नाही. जिल्ह्यात कृषी विभागाने आठ लाख जमीन आरोग्य पत्रिका दिल्या असून नुसार खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा, याबाबत जनजागृती करणार असल्याचे जगताप म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com