संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंगळवेढ्यात किसान सभेचे धरणे

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंगळवेढ्यात किसान सभेचे धरणे
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंगळवेढ्यात किसान सभेचे धरणे

मंगळवेढा, जि. सोलापूर : रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तत्काळ मिळावा व वहिवाटीनुसार संयुक्त समितीद्वारे सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. १७) येथील उपविभागीय कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.  

शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उदय भोसले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले, मंगळवेढा- माचणूरदरम्यान संपादित जमिनीची भरपाई मिळावी म्हणून कागदपत्रे देऊन देखील अद्याप भरपाई मंजूर झालेली नाही तर उताऱ्यावर नाव नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीने संबंधित शेतकऱ्यांची भरपाई रोखून धरण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे तो तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा. जानेवारी महिन्यात महसूलमंत्री समवेत झालेल्या बैठकीमध्ये वहिवाटनुसार संयुक्त समितीद्वारे सर्वेक्षण करावे; परंतु त्या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारीही यासाठी उपस्थित राहिले नसल्याचे कळविले. परंतु, याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. 

या निवेदनावर कॉं. दिगंबर कांबळे, उमेश देशमुख, विजय पवार, शिवाजी नरोटे, मारुती आलदर, दत्तात्रय माळी, ज्ञानेश्‍वर बंडगर, श्रीरंग बंडगर आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

कायदेशीर बाबी पडताळून सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या शेतकऱ्यांचे संपादित होताना नजरचुकीने काही बाबी समाविष्ट करायचे राहिले असतील, त्यांनी तसे अर्ज सादर करावेत. कृषी व महसूलच्या माध्यमातून त्याचे जागेवर सर्वेक्षण करून त्याप्रमाणे त्यांना भरपाई दिली जाईल. - उदय भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com