Agriculture news in Marathi, For the exchange of land acquired in the Mangalvedha, a farmer's meeting will be held | Agrowon

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंगळवेढ्यात किसान सभेचे धरणे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

मंगळवेढा, जि. सोलापूर : रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तत्काळ मिळावा व वहिवाटीनुसार संयुक्त समितीद्वारे सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. १७) येथील उपविभागीय कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

मंगळवेढा, जि. सोलापूर : रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तत्काळ मिळावा व वहिवाटीनुसार संयुक्त समितीद्वारे सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. १७) येथील उपविभागीय कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उदय भोसले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले, मंगळवेढा- माचणूरदरम्यान संपादित जमिनीची भरपाई मिळावी म्हणून कागदपत्रे देऊन देखील अद्याप भरपाई मंजूर झालेली नाही तर उताऱ्यावर नाव नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीने संबंधित शेतकऱ्यांची भरपाई रोखून धरण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे तो तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा. जानेवारी महिन्यात महसूलमंत्री समवेत झालेल्या बैठकीमध्ये वहिवाटनुसार संयुक्त समितीद्वारे सर्वेक्षण करावे; परंतु त्या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारीही यासाठी उपस्थित राहिले नसल्याचे कळविले. परंतु, याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. 

या निवेदनावर कॉं. दिगंबर कांबळे, उमेश देशमुख, विजय पवार, शिवाजी नरोटे, मारुती आलदर, दत्तात्रय माळी, ज्ञानेश्‍वर बंडगर, श्रीरंग बंडगर आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

कायदेशीर बाबी पडताळून सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या शेतकऱ्यांचे संपादित होताना नजरचुकीने काही बाबी समाविष्ट करायचे राहिले असतील, त्यांनी तसे अर्ज सादर करावेत. कृषी व महसूलच्या माध्यमातून त्याचे जागेवर सर्वेक्षण करून त्याप्रमाणे त्यांना भरपाई दिली जाईल.
- उदय भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा

इतर बातम्या
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
पुणे विभागात पाच लाख हेक्टरला पीकविमा...पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...