agriculture news in marathi, Excited about the new MPs in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

नांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल. व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल हाती येण्यास उशीर लागणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाचा गड अबाधित राहणार, कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार, याकडे लक्ष लागल्याने मराठवाड्यातील जनतेची उत्कंठा शिगेला पोचली आहे.

नांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल. व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल हाती येण्यास उशीर लागणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाचा गड अबाधित राहणार, कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार, याकडे लक्ष लागल्याने मराठवाड्यातील जनतेची उत्कंठा शिगेला पोचली आहे.

मतमोजणी केंद्रावर सकाळी सात वाजता मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॅांग रूम उघडण्यात येतील. त्यानंतर आठ वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यानंतर साडेआठच्या दरम्यान मतदान यंत्रावरील मतमोजणीस प्रारंभ होईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर करण्यास विलंब लागू शकतो. दुपारी एकनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल. २०१४ च्या निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी सहा जागा भाजप-शिवसेना युतीला, तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या.

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघाची मतमोजणी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील संकुलात होईल. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, अपक्ष हर्षवर्धन जाधव, एमआयएमचे इम्तियाज जलिल यांच्यात लढत होईल. जालना मतदारसंघाची मतमोजणी दावलवाडी (ता. बदनापूर) येथील संकुलात होईल. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत आहे.

परभणी मतदारसंघाची मतमोजणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यात लढत होईल. हिंगोली मतदारसंघाची मतमोजणी तंत्रनिकेतनमध्ये होणार असून, शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखडे यांच्यामध्ये लढत आहे.

नांदेड मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार असून, काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लढत आहे. लातूर मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काॅंग्रेसचे मच्छिंद्र कामत यांच्यात लढत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...