Agriculture news in Marathi Excited response to 'Janata curfew' in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांवर सर्वत्र शांतता पाहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घेत नागरिकांनी जबाबदारीने तंतोतंत सूचनांचे पालन केल्याचे दिसून आले. 

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांवर सर्वत्र शांतता पाहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घेत नागरिकांनी जबाबदारीने तंतोतंत सूचनांचे पालन केल्याचे दिसून 
आले. 

शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासून पूर्णपणे बंद पाळण्यात आला. प्रत्येक घटकाने कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळेच नाशिक मध्य, जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिक रोड या सर्व विभागांत कुठेही जमाव दिसून आला नाही, नागरिकांनी घरात थांबणे पसंद केले. शहरातील काही ठिकाणी दूध खरेदीची गर्दी वगळता सर्व कामकाज शांत होते. भल्या पहाटेच वर्दळ असलेली बाजार समितीही शांत होती. 

शहरातील रामकुंड, फूलबाजार, मेनरोड, जॉगिंग ट्रॅक, सीबीएस चौक, अशोक स्तंभ, गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, भोसला सर्कल, जेहान सर्कल, एबीबी सर्कल, मायको सर्कल, सिटी सेंटर मॉल, द्वारका, मुंबई नका ही गजबजलेली ठिकाणे शांत होती. सकाळी लवकर दशक्रिया विधी आटोपून गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबीयांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विधी आटोपून परतले. त्यामुळे संचारबंदीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठराविक अंतराने एखादी दुचाकी, चौकांमध्ये पोलिस कर्मचारी दिसून आले. क्वचित दिसून आलेल्या रुग्णवाहिका यापेक्षा कोणतीही वर्दळ दिसून 
आली नाही.


इतर बातम्या
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...