दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उत्साहात ग्रामपंचायतींचे मतदान
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) १० लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी ८ लाख ८० हजार ६२ मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात ८०.३६ टक्के मतदान झाले.
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) १० लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी ८ लाख ८० हजार ६२ मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात ८०.३६ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात सर्वाधिक ९६ ग्रामपंचायतींसाठी मतदान मालेगाव तालुक्यात, तर सर्वांत कमी ७ ठिकाणी मतदान इगतपुरी तालुक्यात झाले. मतदानाची सर्वाधिक टक्केवारीची नोंद त्र्यंबकेश्वर तालुक्यात, तर सर्वात कमी बागलाण तालुक्यात झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच झालेल्या निवडणुकीत १३ तालुक्यांत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका रंगल्याने तरुणाईचा सहभाग दिसून आला. मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसून आली. अडचणी उद्भवू नयेत, यासाठी निवडणूक यंत्रणेने विशेष मेहनत घेतली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशिराचा अर्धा तास कोरोनाबाधितांसाठी वेळ राखीव ठेवला होता. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीची पूर्वतयारी म्हणून महत्त्व असलेल्या या गावोगावच्या निवडणुकांत प्रस्थापित विरुद्ध तरुणाई, असा सरळ संघर्ष पाहायला मिळाला.
तालुक्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या मोठ्या गावातील राजकारणाने वातावरण ढवळून निघाले. मात्र मोठ्या गावांमध्ये तुलनेत कमीच मतदान झाल्याचे आकड्यांवरून समोर आले आहे. येत्या सोमवारी (ता.१८) तालुकास्तरावर मतमोजणी होईल. आहे.आता निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.
- 1 of 1054
- ››