नगर जिल्ह्यात मतदानासाठी उत्साह
नगर जिल्ह्यात मतदानासाठी उत्साह

नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदान

नगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार संघासाठी सोमवारी (ता. २१) सरासरी ६५.१६ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड होण्याचा अपवाद वगळता जिल्हा भरात सुरळीत मतदान झाले. मतदान करण्यासाठी नागरिक, महिलांसह नव तरूण मतदाराचाही उत्साह पहायला मिळाला.  नगर जिल्हा मतदान (टक्के)

  • अकोले ः ६७.७३
  • संगमनेर ः ७१.७२ 
  • शिर्डी ः ६४.५१ 
  • कोपरगाव ः ६९.५५ 
  • श्रीरामपुर ः ६२.१४ 
  • नेवासा ः ७२.६४ 
  • शेवगाव ः ६३.०५
  • राहुरी ः ६३.२९
  • पारनरे ः ६४.२० 
  • नगर ः ४८.७२ 
  • श्रीगोंदा ः ६४.४३ 
  • कर्जत-जामखेड ः ७१.५७ एकूण जिल्हा टक्केवारी ः ६५.१६ 
  • एकूण मतदान ः 

  • पुरुष ः १८,०७,८५५ 
  • महिला ः १६,६५,७२६ 
  • झालेले मतदान 

  • पुरुष ः १२,१४,२८९ 
  • महिला ः १०,४९,१५४ 
  • विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी मतदानाला लवकर सुरवात झाली मात्र काही भागात पावसाची चिडचिड असल्याने सकाळी दहा पर्यत मतदान प्रक्रियेला फारसा वेग आला नाही. दुपारी अकरा नंतर पावसाने उघडीप दिल्याने मतदान करण्यासाठी नागरिक, महिलांसह नव तरूण मतदाराचाही उत्साह पहायला मिळाला. वृद्ध मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी कार्यकत्याची लगबग पहायला मिळाली. 

    जिल्हाभरात अनेक मतदान केंद्र परिसरात पावसामुळे चिखल झाल्याने मतदारांना अडचणीचा सामना करावा लागला. पारनेर मतदार संघातील मोकपोल दरम्यान काही गावांतील मतदान मशीन बंद पडले तर मतदान सुरू असताना नांदूर पठार, रायतळे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, व मुगशी येथील मशीन बंद पडले काही अर्धा तास तर काही एक तासानंतर सुरू झाले. राशीन ता. कर्जत येथेही मतदान यंत्र बंद पडले होते. अकोले तालुक्यातही काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला होता. 

    जिल्हाभरात दुपारी एक वाजेपर्यंत ३८ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले होते. नेवासा, कर्जत-जामखेड मतदार संघात मतांची टक्केवारी अधिक होती. जिल्हाअधिकारी राहुल द्विवेदी याच्यासह.प्रमुख अधिकारयानीमतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी केली.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com