Agriculture news in marathi; Exclusion from polls to cast villages in Karanja Ghadge taluka under Tiger terror | Agrowon

वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून वाघाची दहशत आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. 

वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून वाघाची दहशत आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. 

कारंजा घाडगे तालुक्‍यातील बोरगाव (गोंडी), ससून्द, मेठहिरजी, गरमसुर, धानोली परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. या कालावधीत तब्बल ५० जनावरांचा फडशा या वाघाकडून पाडण्यात आला. गोठ्यातील जनावरे देखील सुरक्षीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच आगरगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्यांच्या संतापात भर पडली. वनविभागाकडून या वाघांचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरातील भागात दहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. गावकऱ्यांचा रोष वाढता असल्याने वनविभागाकडून दरदिवशी शोध मोहीम देखील राबविली जात आहे. हे सारे प्रयत्न करूनही वाघाचा मागमूस लागला नाही. दुसरीकडे वाघाकडून जनावरांचा फडशा पाडण्याचे सत्र सुरू आहे. दरम्यान वनविभागाने हा वाघ नसून पिंकी नामक वाघीण असल्याचा खुलासा केला आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात ती परतल्याचेही वनविभाग सांगत आहे. 

गावकऱ्यांनी लावले बहिष्काराचे फलक
जनावरे आणि नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी किंवा ठार मारणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. त्याचा विरोध म्हणून निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे. काही गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ काळे झेंडे गावात लावले आहेत. बोरगाव गोंडी गावात ठिकठिकाणी बहिष्काराचे फलक झळकले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...